आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलांटा ओपन टेनिस: अमेरिकेच्या जॉन इस्नरने सलग तिसऱ्यांदा पटकावला पुरुष एकेरीचा किताब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलांटा- अमेरिकेचा स्टार युवा खेळाडू जॉन इस्नरने एटीपी अटलांटा अाेपन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. त्याने पुरुष एकेरीची फायनल जिंकून हे साेनेरी यश संपादन केले. याशिवाय त्याने सलग तिसऱ्यांदा या टेनिस स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. दुसरीकडे अमेरिकेच्या बॉब आणि माइक या ब्रायन बंधूंनी पुरुष दुहेरीचा किताब पटकावला.

अमेरिकेच्या इस्नरने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये सायप्रसच्या मार्कोस बगदातिसचा पराभव केला. त्याने ६-३, ६-३ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह त्याने जेतेपद आपल्या नावे केले. सरस खेळी करून त्याने सरळ दोन सेटमध्ये अंतिम सामना जिंकला. दरम्यान, पाचव्या मानांकित बगदातिसने विजयासाठी शर्थीची झूंज दिली. मात्र, त्याला समाधानकारक खेळी करता आली नाही. पराभवामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
येलेना यांकोविकला जेतेपद
सर्बियाची येलेना यांकोविक डब्ल्यूटीए जियांगजी ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. चीनमधील स्पर्धेत तिने महिला एकेरीचा किताब पटकावला. अव्वल मानांकित यांकाेविकने महिला एकेरीच्या फायनलमध्ये चेन चांगचा पराभव केला. तिने ६-३, ७-६ अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने अजिंक्यपदावर नाव काेरले. यासाठी तिला तैपेईच्या चांगने एक तास ५९ मिनिटे झुंजवले. यासाठी तैपेईच्या खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये शर्थची झूंज दिली. त्यामुळे रंगतदार लढतीने हा सेट टायब्रेकरपर्यंत खेचला गेला. मात्र, यात सरस खेळी करून सर्बियाच्या यांकोविकने बाजी मारून सामना आपल्या नावे केला. या जेतेपदासह यांकोविकला २० हजार डॉलरचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. याशिवाय या जेतेपदामुळे तिला जागतिक क्रमवारीत १६० गुणांचा फायदा झाला.
बातम्या आणखी आहेत...