आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन : के. श्रीकांतचा दुसऱ्यांदा नंबर वन साेनवर सनसनाटी विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- इंडाेनेशिया अाेपन चॅम्पियन के. श्रीकांतने सलग दुसऱ्यांदा नंबर वन साेन वानला धूळ चारून अापले निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवले. त्याने गुरुवारी अाॅस्ट्रेलियन अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये सनसनाटी विजय संपादन केला. या विजयासह त्याने अंतिम अाठमध्ये प्रवेश केला. यापूर्वी श्रीकांतने इंडाेनेशिया अाेपनमध्ये वानचा पराभव केला हाेता.  दुसरीकडे रिअाे अाॅलिम्पिकची राैप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू, माजी नंबर वन सायना नेहवाल अाणि बी. साई प्रणीतने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अाता हीच लय अागामी सामन्यातही कायम ठेवण्याचा या खेळाडूंचा प्रयत्न असेल. यासाठी सिंधू अाणि सायना प्रयत्नशील अाहेत.
 
श्रीकांत ५७ मिनिटांत विजयी :  श्रीकांतने ५७ मिनिटांमध्ये नंबर वन साेन वानला पराभूत केले. त्याने १५-२१, २१-१३, २१-१३ ने राेमहर्षक विजय संपादन केला. या विजयामुळे त्याला उपांत्यपूर्व फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. याशिवाय त्याने वानविरुद्धच्या विजयाचे रेकाॅर्ड ४-४ ने बराेबरीत केले. या विजयाने त्याने क्रमवारीत माेठी प्रगती साधली. त्याने २२ वरून अाता ११ वे स्थान गाठले.
 
श्रीकांत-साई प्रणीत भिडणार 
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये  के. श्रीकांत अाणि बी. साई प्रणीत झंुजणार अाहेत. या दाेघांनीही अंतिम अाठमध्ये प्रवेश केला. साई प्रणीतने चीनच्या हुअांग युशियानला ६४ मिनिटांमध्ये पराभूत केले. त्याने २१-१५, १८-२१, २१-१३ ने विजय संपादन केला. अातापर्यंत  सहा वेळा हे दाेघे समाेरासमाेर अाले. यात प्रणीतच्या नावे ५-१ ने विजयाची नाेंद अाहे.
 
सिंधूसमाेर अंतिम अाठमध्ये नंबर वन यिंगचे अाव्हान 
महिला एकेरीमध्ये भारताची सिंधू अाणि सायना विजयी झाल्या. सिंधूने चीनच्या चेन झिया अाेझिनचा ४६ मिनिटांमध्ये पराभव केला. तिने २१-१३, २१-१८ अशा फरकाने विजय मिळवला. अाता तिचा सामना नंबर वन ताई जू यिंगशी हाेईल. या विजयाने तिला क्रमवारीतील तिसरे स्थान काय ठेवता अाले.  सायना नेहवालने मलेशियाच्या साेनिया चियाहवर मात केली. तिने २१-१५, २०-२२, २१-१४ ने सामना जिंकला.
बातम्या आणखी आहेत...