आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना, नाेवाक याेकाेविक, अँडी मरेची खडतर वाट, साेमवारपासून अाॅस्ट्रेलियन अाेपन; ड्राॅ जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - सहा वेळची चॅम्पियन सेरेना विल्यम्ससह जगातील नंबर वन अँडी मरे अाणि माजी नंबर वन नाेवाक याेकाेविकची यंदाच्या सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपनमधील वाट अधिकच खडतर मानली जात अाहे. कारण या तिन्ही टेनिसपटूंना अापापल्या गटात बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. सेरेना स्पर्धेत सातव्यांदा चॅम्पियन हाेण्यासाठी उत्सुक अाहे.  साेमवारपासून अाॅस्ट्रेलियन अाेपनला सुरुवात हाेणार अाहे. या स्पर्धेसाठी शुक्रवारी ड्राॅ काढण्यात अाला.   

अमेरिकेच्या सेरेनाला महिला एकेरीच्या सलामी सामन्यात स्विसच्या बेलिंडा बेनसिचच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. या सामन्यातून तिला स्पर्धेतील अापल्या माेहिमेला सुरुवात करता येईल. बेलिंडा ही जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर अाहे. तसेच जगातील नंबर वन एंजेलिक कर्बरलाही कठीण ड्राॅ मिळाला अाहे. तिचा सलामी सामना युक्रेनच्या लेसिया सुरेंकाेशी हाेईल.   

इंग्लंडचा मरे हा सहाव्यांदा पुरुष एकेरीच्या फायनल प्रवेशासाठी उत्सुक अाहे. मात्र, त्याची वाट अधिकच खडतर अाहे. त्याचा पहिल्या फेरीतील सामना युक्रेनच्या इलिया मार्चेंकाेशी हाेणार अाहे. तसेच याेकाेविकला सलामी सामन्यात अनुभवी वर्दास्काेच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.