आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेंद्र प्रोफेशनल बॉक्सिंगसाठी सज्ज, १० ऑक्टोबर मँचेस्टरला लढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंद्रसिंग प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये आपला पहिला पंच मारण्यास सज्ज झाला आहे. प्रोफेशनल बॉक्सिंगसाठी तो जोरदार तयारी करीत आहे. आपल्या पहिल्या फाइटसाठी तो आतुर असून, मँचेस्टर येथील आपल्या जिमला त्याने ऑफिसमध्ये बदलले आहे. सध्या विजेंद्र रोज आठ ते दहा तास सराव करीत आहे. भारताच्या या बॉक्सरला १० ऑक्टोबर रोजी मँचेस्टर येथे पहिला प्रोफेशनल सामना खेळायचा आहे.

याबाबत दूरध्वनीवर बोलताना विजेंद्र म्हणाला, "मी सध्या यासाठी कठोर सराव करीत आहे. मी माझ्या जिमलाच ऑफिस बनवले आहे. जिममध्ये सकाळी माझा सराव १० ते १०.३० वाजता सुरू होतो. एक वाजता लंच ब्रेक होतो. यानंतर पुन्हा सायंकाळी आम्ही सराव करतो.'

कठोर सराव सुरू आहे :
आम्ही जिममध्ये वर्कआऊट सेशन, स्पेअरिंग सेशन आणि विविध पार्टनरसोबत सराव करीत आहोत. जलतरणसुद्धा याचा एक भाग आहे. मी सरावाहून आल्यानंतर पूर्णपणे थकलेलो असतो. स्वत:वर केलेल्या मेहनतीचा मी आनंद लुटत आहे. माझे शरीर आता पूर्वीपेक्षा खूप उत्तम झाले आहे. फिटनेस चांगला वाटत आहे, असे विजेंद्र म्हणाला.
बेअर्डकडून घेत आहे प्रशिक्षण
विजेंद्र सध्या नावाजलेले ट्रेनर ली बेअर्ड यांच्याकडून ट्रेनिंग घेत आहे. मी सध्या थेट पंच, काउंटर अटॅक आणि क्लीन स्ट्रेट पंचवर फोकस करत आहे. सोबत मी माझ्या शरीरावरही मेहनत घेत आहे. प्रोफेशेनल बॉक्सिंगमध्ये पंचला खूप महत्त्व असते, यामुळे माझे सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे. मी फाइटमध्ये विरोधी खेळाडूच्या शरीराला अधिकाधिक टार्गेट करेल, असे तो म्हणाला.
फक्त फाइटवर लक्ष
माझा विरोधी बॉक्सर कोण आहे, याने काय फरक पडतो? विरोधी खेळाडू एक दिवस आधी ठरला काय किंवा एका रात्री आधी ठरला तरी मला फरक पडत नाही. मला फक्त फाइट करायची आहे. त्याचे नाव एक आठवडा आधी मला कळले तर त्याच्या खेळानुसार तयारी करता येऊ शकेल, हेही सत्य आहे. यामुळे त्याचा खेळ व दुबळी बाजू शोधण्यासही वेळ मिळतो. सध्या माझे पूर्ण लक्ष फाइटवर आहे. मी फक्त माझे काम करीत आहे. मी विजयासाठी मी वाट बघत आहे, असे ताे म्हणाला.