आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्टिनने पहिल्यांदा जिंकली नास्कर सिरीज रेस, ट्रॅकवर पाेहून केला जल्लाेष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्लाेट (नाॅर्थ कॅराेलिना) - अमेरिकेच्या अाॅस्टिन डिलीयनने माॅन्स्टर एनर्जी सिरीजची चार्लाेट नास्कर रेस अापल्या नावे केली. रिचर्ड चिल्ड्रेन्स रेसिंग टीमच्या अाॅस्टिनने शेवरलेच्या कारमध्ये ही रेस जिंकली. या शर्यतीला सिरीजमधील सर्वात माेठी रेस मानली जाते. ही रेस ६०० मैलांची अाहे. यामध्ये ४०० पेक्षा अधिक वळणे अाहेत. काएले बुशने दुसरे स्थान गाठले. टाेयाटाेच्या रेसर काएले हा गिब्स रेसिंग टीमकडून रेसमध्ये सहभागी झाला हाेता. मार्टिन ट्रुएक्सने या रेसमध्ये तिसरे स्थान पटकावले. डिलीयन अाणि त्याच्या टीम सहकारी खेळाडू चार्लाेटने स्पीडवे ट्रॅकवर स्वीमिंगसारखे करून अापल्या विजयाचा जल्लाेष केला.
 
पुढील  स्लाइडवर वाचा, ३६ रेस असतात या सिरीजमध्ये...
बातम्या आणखी आहेत...