आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीगमध्ये हिंगीससह दिग्गजांचा सहभाग !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक टेनिसमध्ये आपल्या खेळाने भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विजय अमृतराजने आता भारताच्या कानाकोपऱ्यात टेनिसचा प्रचार व प्रसार करायचा ध्यास घेतला आहे. गतवर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर अमृतराजच्या ‘इंडियन टेनिस लीग’ने यंदा दुसऱ्या पर्वात नागपूर आणि रायपूरसारख्या ठिकाणीही जागतिक दर्जाचे टेनिस नेण्याचा चंग बांधला आहे.
यंदा १० वरून १४ दिवसांचे दर्जेदार टेनिस भारतवासीयांना दाखवण्याचा मनोदय अमृतराजने मुंबईत व्यक्त केला. २३ नोव्हेंबरपासून चॅम्पियन टेनिस लीग सुरू होईल. या लीगमध्ये मार्टिना हिंगीससह दिग्गज खेळाडू सहभागी होतील.

विजय अमृतराज यांनी सांगितले की, भारतामध्ये होणारी जगातील चॅम्पियन टेनिसपटूंची ही लीग भारतीय खेळाडूंसमवेत व भारतीय प्रेक्षकांच्या समोर होत असल्याने आगळे महत्त्व आहे. ६ शहरांच्या संघात प्रत्येकी १-१ पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय स्टार टेनिसपटू असेल. एका भारतीय खेळाडूला प्रत्येक संघात संधी देण्यात आली आहे, तर एक एटीपी खेळाडू असेल. विजेत्याला एक कोटी, तर उपविजेत्याला ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक असेल. दोन आठवड्यांच्या कालावधीत एकूण १३ सामने होतील. ६ संघांची २ गटांत विभागणी करण्यात आली आहे. येत्या २३ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल.
लीगमध्ये सहभागी संघ व खेळाडू
मुंबई : क्रायचेक, सेप्पी, पेन्नेट्टा, बालाजी
नागपूर : कोरेटा, लोपेझ, योकोविक, शरन
रायपूर : मस्टर, अँडरसन, कोरनेट, रामनाथन
चंदिगड मार्शल : रुझेस्की, वगदातीस, स्विटोलिना, मायनेनी.
हैदराबाद : जॉन्सन, कार्लोविक, हिंगीस, जीवन
६ वा संघ : शुटलर, वेर्डास्को, वॉटसन, वर्धन
प्रत्येक शहराच्या नावाने खेळणाऱ्या संघाला स्वगृही व प्रतिस्पर्ध्याकडे सामना खेळावा लागेल.