आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

92 देशांच्या जीडीपीपेक्षाही युराेपीय फुटबाॅलचे अधिक मार्केट व्हॅल्यू !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल), स्पॅनिश लीगपाठाेपाठ (ला लीगा) अाता चॅम्पियन्स लीगच्या प्रारंभाने युराेपीय फुटबाॅलच्या नव्या सत्राला सुरुवात झाली. या युराेपिय फुटबाॅलचे मार्केट व्हॅल्यू तब्बल १.९१ लाख काेटींवर येऊन पाेहाेचले अाहे. या स्पर्धेला शुक्रवारी माेठ्या उत्साहात सुरुवात झाली. अर्थव्यवस्थेच्या अभ्यासासून ही अाकडेवारी तब्बल ९२ देशांच्या विकास निधीपेक्षाही (जीडीपी) अधिक असल्याचे लक्षात येते. भारतातील १० कंपन्यांचा मार्केट व्हॅल्यू हा या स्पर्धेपेक्षा अधिक अाहे.

या स्पर्धेत खेळणाऱ्या राेनाल्डाे अाणि मेसीची अाठवडाभरातील कमाई ही २.६६ काेटींच्या जवळपास अाहे. अार्थिक बाबतीत खेळाडूंना काेट्यवधींची कमाई करून देत असल्यामुळेच या स्पर्धेला जगभरात माेठी पसंती अाहे. त्यामुळेच या स्पर्धेत खेळण्याचे जगभरातील सर्वच फुटबाॅलपटूंचे एक स्वप्न असते.

५० सर्वाधिक श्रीमंत क्लबपैकी ३० खेळतात
चॅम्पियन्स लीग ही युराेपीय फुटबाॅलमधील सर्वात माेठी स्पर्धा अाहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यांचे जून ते अाॅगस्टदरम्यान अायाेजन केले जाते. त्यानंतर १३ सप्टेंबरपासून सामन्यांना सुरुवात हाेते. ही लीग तब्बल ३४० दिवसांपर्यंत रंगते. या स्पर्धेची फायनल येत्या ३ जून २०१७ राेजी हाेणार अाहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, राेनाल्डाेची कमाई धाेनीपेक्षा चारपट... मँचेस्टर युनायटेड क्लबची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक... अायपीएलपेक्षा सहापट अधिक लीगचे रेव्हेन्यू ....
बातम्या आणखी आहेत...