आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करचोरी प्रकरणी मेस्सीसह त्याच्या वडिलांना २१ महिन्यांचा तुरुंगवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद | बार्सिलोनाचा खेळाडू आणि पाच वेळचा वर्ल्ड फुटबॉलर ऑफ द इयर लिअोनेल मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना बार्सिलोनाच्या न्यायालयाने कर घोटाळ्यात २१ महिन्यांची कैद सुनावली आहे. या गुन्ह्यांसाठी मेस्सीला २० लाख युरो (सुमारे १५ कोटी रुपये) आणि त्याच्या वडिलांना १५ लाख युरोंचा (११ कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. तथािप, ही शिक्षा सुनाावल्यानंतरही मेस्सी व त्याच्या वडिलांना तुरुंगात जावे लागणार नाही. स्पेनच्या कायद्यानुसार, अहिंसक प्रकरणांत दोन वर्षांपेक्षा कमी शिक्षा मिळाल्यास कैद भोगावी लागत नाही. या दरम्यान त्याला देखरेखीत राहावे लागेल.
काय अाहे प्रकरण
२००७ ते २००९ दरम्यान स्पेनमध्ये सुमारे ४२ लाख युरोंचा (सुमारे ३१ कोटी रुपये) घोटाळा तसेच उरुग्वे व बेलिझमध्ये बनावट कंपन्यांद्वारे करचोरीचा आरोप मेस्सीवर आहे.
मी फक्त फुटबॉल खेळतो. मला आर्थिक व्यवस्थापनाची काहीच माहिती नसते.
- लियोनेल मेस्सी, फुटबाॅलपटू
पुढील स्लाइडवर, प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पिस्टोरियसला कैद...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...