आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक : युकी, रामकुमारचा विजय; भारताची २-० ने अाघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- युवा खेळाडू युकी भांबरी अाणि रामकुमार रामनाथने डेव्हिस चषकाच्या अाशिया/अाेशियानाच्या ग्रुप-१ मध्ये यजमान भारतीय संघाला शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध अाघाडी मिळवून दिली. भारताने सलामीच्या विजयाच्या बळावर २-० ने अाघाडी मिळवली. युकीने पुरुष एकेरीचा सलामीचा सामना जिंकला. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात करता अाली. त्यानंतर रामकुमारने दुसरा सामना अापल्या नावे केला. 
 
जागतिक क्रमवारीत ३६८ व्या स्थानावर असलेल्या युकीने सलामीला राेमहर्षक विजय मिळवला. त्याने सामन्यात न्यूझीलंडच्या २६ वर्षीय फिन ट्रेनीचा पराभव केला. त्याने ६-४, ६-४, ६-३ अशा फरकाने विजय मिळवला. यासाठी २४ वर्षीय युकीला सामन्यात २ तास १० मिनिटांपर्यंत शर्थीची झंुज द्यावी लागली. यातील सरस खेळीच्या बळावर त्याने विजयश्री खेचून अाणली.  

रामकुमारचा जाेसवर विजय : भारताच्या रामकुमार रामनाथनने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये शानदार विजय मिळवला. त्याने   जाेस स्टॅथमवर ६-३, ६-४, ६-३ ने मात केली.    

अाज पेसवर नजर : १८ वेळच्या   ग्रँडस्लॅम चॅम्पियन लिएंडर पेस पुरुष दुहेरीत विष्णू वर्धनसाेबत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. या जाेडीचा सामना शनिवारी  साटेक व व्हिनसशी हाेईल. यातून पेसला विश्वविक्रमाची संधी अाहे.
बातम्या आणखी आहेत...