नवी दिल्ली- दाेन वेळच्या विश्वविजेत्या घानाने तिसऱ्या विश्वचषकाच्या माेहिमेची उद््घाटनीय सामन्यात विजयाची किक मारली. या संघाने शुक्रवारी फिफाच्या वर्ल्डकप सलामी सामन्यात दुबळ्या काेलंबियाला १-० ने धूळ चारली. यासह घानाने स्पर्धेत धडाकेबाज विजयाचे खाते उघडले.
सादिक इब्राहिमने (३९ वा मि.) घानाला विजय मिळवून दिला. याशिवाय घानाने स्पर्धेत पहिला विजय नाेंदवला. दुसरीकडे यजमान भारताच्या युवा संघाला सलामी सामन्यात पराभवाला सामाेेरे जावे लागले. १५ वेळा वर्ल्डकप खेळणाऱ्या अनुभवी अमेरिकन टीमने दिल्लीतील दुसऱ्या सामन्यात भारतावर मात केली. अमेरिकेने ३-० अशा फरकाने सामना जिंकला. जाेशुअा सार्गेंट (३० वा मि.), क्रिस्टाेफर डुर्किन (५१ वा मि.) अाणि कार्लटनने (८४ वा मि.) यांनी प्रत्येकी एका गाेलच्या बळावर अमेरिकेला एकतर्फी विजय मिळवून दिला. भारताकडून अन्वर अलीने गाेलपाेस्टवर परफेक्ट हल्ला चढवला हाेता. मात्र, चेंडू गाेलपाेस्टला धडकून परतला. त्यामुळे भारताला सामन्यात गाेलचे खाते उघडता अाले नाही. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवरचा न्यूझीलंड व तुर्की यांच्यातील रंगतदार सामना १-१ ने बराेबरीत राहिला. तसेच पराग्वेने मालीवर ३-२ ने मात केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी खेळाडूंचा सत्कार केला.
दमदार सुरुवात करणाऱ्या घानाने पहिल्या क्वार्टरमध्येच सामन्यावर मजबूत पकड घेतली. मात्र, काेलंबियानेही घानाचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये इब्राहिमने गाेलचे खाते उघडले.
साेमवारी भारतासमाेर काेलंबिया
अाता भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना साेमवारी हाेणार अाहे. भारतासमाेर काेलंबिया टीम असेल. या दाेन्ही संघांना अापापल्या गटात सलामीला पराभवाचा सामना करावा लागला.
न्यूझीलंडने तुर्कीला राेखले
मुंबईच्या मैदानावर वर्ल्डकपमधील सामन्यात पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंडने पराभव टाळला. यासह न्यूझीलंडने रंगतदार लढतीमध्ये तुर्कीला बराेबरीत राेखले. माटाने ५८ व्या मिनिटांला गाेल करून न्यूझीलंडला बराेबरी मिळवून दिली. त्यामुळे न्यूझीलंड अाणि तुर्की यांच्यातील सामना १-१ ने बराेबरीत राहिला. कुटुकुने १८ व्या मिनिटाला गाेल करून तुर्कीला अाघाडी मिळवून दिली हाेती. तुर्कीच्या विजयाचा अाशाही पल्लवित झाल्या हाेत्या. दरम्यान माटाने गाेल करून हा सामना बराेबरीत ठेवला.
पॅराग्वे विजयी; मालीवर ३-२ ने केली मात
मुंबईत पॅराग्वेने शानदार विजय संपादन केला. या टीमने लढतीत मालीवर ३-२ ने मात केली. गालेअानाे (१२ वा मि.), सांचेझ (१७ वा मि.) अाणि फ्रान्सिस्काेने (५५ वा मि.) प्रत्येकी एक गाेल करून पॅराग्वेचा विजय निश्चित केला. मालीकडून ड्रामे (२० वा मि.) अाणि नादियाने (३४ वा मि.) प्रत्येकी एक गाेल केला.
घानाची विजयी सलामी
सादिक इब्राहिमने (३९ वा मि.) घानाला विजय मिळवून दिला. याशिवाय घानाने स्पर्धेत पहिला विजय नाेंदवला. यासह घानाने दमदार सुरुवात केली.
जर्मनी-काेस्टारिका झुंजणार
जर्मनीचा सलामी सामना काेस्टारिकाशी हाेईल. क गटात हा सामना रंगणार अाहे. गाेव्याच्या फाताेडा मैदानावर या सामन्याचे अायाेजन करण्यात अाले.
चाैथ्या किताबासाठी ब्राझील अॅक्शनमध्ये!
तीन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन ब्राझील युवा संघ अाता चाैथ्या किताबाच्या इराद्याने यंदा वर्ल्डकपच्या मैदानावर उतरणार अाहे. यासाठी ब्राझीलच्या युवांनी कंबर कसली अाहे. ब्राझील टीम शनिवारी काेचीच्या मैदानावर हाेणाऱ्या अापल्या ड गटातील सामन्यातून अापल्या माेहिमेला सुरुवात करेल. ड गटातील पहिल्या सामन्यात ब्राझील अाणि स्पेन संघ समाेरासमाेर असतील.
ब्राझीलने अातापर्यंत तीन वेळा वर्ल्डकपची ट्राॅफी पटकावली अाहे. दुसरीकडे स्पेनच्या टीमला तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे तीन किताबाच्या बळावर ब्राझीलने युवांच्या या स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला अाहे. हेच वर्चस्व अबाधित ठेवण्याचा ब्राझीलचा प्रयत्न असेल. यासाठी टीमची नजर विजयी सलामीकडे लागली अाहे. ब्राझीलकडे १५ वेळा वर्ल्डकप खेळण्याचा तगडा अनुभव अाहे. या टीमच्या युवांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना पाच वेळा फायनल गाठली अाहे. अाता शानदार कामगिरी करताना यंदा फायनल गाठण्याचा ब्राझीलचा प्रयत्न असेल.
अन्य फोटो पहाण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...