आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराे चषक फुटबाॅल : फायनलमध्ये फ्रान्स अाणि पाेर्तुगाल भिडणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस | वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीचे अाव्हान संपुष्टात अाणून यजमान फ्रान्स संघाने युराे चषक फुटबाॅल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अाता किताबासाठी रविवारी फ्रान्स अाणि पाेर्तुगाल यांच्यात अंतिम सामना रंगणार अाहे. फ्रान्स संघ अापल्या घरच्या मैदानावर तिसऱ्यांदा मेजर किताब जिंकण्याच्या इराद्याने उतरणार अाहे. यापूर्वी फ्रान्स संघाने १९८४ मध्ये युराे कप अाणि १९९८ मध्ये विश्वचषक जिंकला हाेता. अाता फ्रान्स टीमला तिसऱ्यांदा युराे चषकाची अंतिम फेरी गाठता अाली. यापूर्वी यजमान टीमने दाेन वेळा फायनलमध्ये धडक मारली हाेती. अंतिम फेरीतील विजयासह फ्रान्सला किताबही नावे करता अाला.
रोनाल्डो विरुद्ध ग्रिजमॅन - सत्ते पे सत्ता
दाेन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश अाहे. मात्र, या फायनलला राेनाल्डाे विरुद्ध अॅटाेनी ग्रिजमॅन असे नाव देण्यात अाले अाहे. दाेघेही सातव्या क्रमांकाचे टी शर्ट घालत असल्याचा याेगायाेग अाहे. सर्वाधिक गाेलमध्ये ग्रिजमॅन (६) हा अाघाडीवर अाहे. स्पर्धेत अातापर्यंत राेनाल्डाेने ३ गाेल केले अाहेत.

१९७५ मध्ये पाेर्तुगालचा शेवटचा विजय
> फ्रान्सने सलग १० सामन्यांत पाेर्तुगालचा पराभव केला. फ्रान्सची दुसरी अबाधित माेहीम. लक्झेम्बर्गला फ्रान्सने १३ सामन्यांत हरवले
> मेजर स्पर्धेत हे दाेन्ही संघ चाैथ्यांदा भिडणार अाहेत. फ्रान्सने गत लढतीत जिंकले. यात युराे १९८४, युराे २००४ व वर्ल्डकप २००६ चा समावेश अाहे.
> पाेर्तुगालने ४१ वर्षांपूर्वी फ्रान्सला शेवटचे एप्रिल, १९७५ मध्ये हरवले हाेते. पाेर्तुगालकडून फ्रान्सविरुद्ध गत चार सामन्यांत एकमेव गाेल झाला.
> २४ सामन्यांत दाेन्ही संघ झुंजले, १८ मध्ये फ्रान्स व पाचमध्ये पाेर्तुगाल विजयी. एक लढत ड्राॅ.
> ४९ गाेल फ्रान्स संघाने पाेर्तुगालविरुद्ध सामन्यात केले. पाेर्तुगालने फ्रान्सविरुद्ध २९ गाेल केले.
> राेनाल्डाेने अातापर्यंत १३२ अांतरराष्ट्रीय सामन्यांत ६१ गाेल केले अाहेत.
> ग्रिजमॅनचे अातापर्यंत ३३ अांतरराष्ट्रीय सामन्यांत १३ गाेल
स्पर्धेतीत कामगिरी - पोर्तुगाल
सामने०६
गोल केले०८
गोल झाले०५
यशस्वी पास ८७%
स्पर्धेतीत कामगिरी - फ्रान्स
सामने०६
गोल केले१३
गोल झाले०४
यशस्वी पास ८८%
पुढे वाचा, मेसी विरुद्ध राेनाल्डाे चर्चेला विराम...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


बातम्या आणखी आहेत...