आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स फुटबाॅल लीग:अखेरच्या 7 मिनिटांत 3 गोल करून बार्सिलोना विजयी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलाेना- स्पॅनिश क्लब बार्सिलाेनाने चॅम्पियन्स फुटबाॅल लीगची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या क्लबने अंतिम १६ च्या दुसऱ्या लेगमध्ये पॅरिस सेंट जर्मेनवर ६-१ अशा फरकाने विजय संपादन केला. या रंगतदार सामन्यांच्या ८८ व्या मिनिटापर्यंत बार्सिलाेनाने ३-१ ने अाघाडी घेतली हाेती. त्यानंतर सात मिनिटांत तीन गाेल करून स्पॅनिश क्लबने सामना अापल्या नावे केला. कारण, अंतिम अाठमधील प्रवेशासाठी बार्सिलाेनाला सात मिनिटांमध्ये तीन गाेलची अावश्यकता हाेती. नेमारने ८८ अाणि ९१ व्या मिनिटाला गाेल करून अाशा पल्लवित केल्या. त्यानंतर ९५ व्या मिनिटाला राॅबर्टाने विजयी गाेल करून बार्सिलाेनाचा अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. पीएसजीने पहिल्या लेगमध्ये बार्सिलाेनाला ४-० ने धूळ चारली हाेती.   
 
युराेपियन फुटबाॅलच्या इतिहासामध्ये प्रथमच पहिल्या लेगमध्ये ०-४ ने पिछाडीवर पडल्यानंतरही काेणत्याही टीमने कमबॅक करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली अाहे. यापूर्वी २००४ मध्ये डेपाेर्टिव्हाेने क्वार्टर फायनलच्या पहिल्या लेगमध्ये एसी मिलानवर ४-१ ने मात केली हाेती. दुसऱ्या लीगमध्ये या क्लबने ४-० ने विजयासह पुढच्या फेरीत प्रवेश केला.   
 
या विजयाची तुलना १९९९ चॅम्पियन्स लीगमधील युनायटेड व लिव्हरपूलच्या सामन्याशी हाेते. 
 फायनलमध्ये मँचेस्टर युनायटेडने बायर्न म्युनिखविरुद्ध इंज्युरी टाइममध्ये दाेन गाेल करून ट्राॅफी नावे केली हाेती. तसेच २००५ च्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलने बाजी मारली हाेती. 
 
लुईस सुअारेझमुळे बार्सिलाेनाची चांगली सुरुवात 
केंप नाऊ स्टेडियममध्ये ९९ हजार चाहत्यांच्या समाेर लुईस सुअारेझने तिसऱ्या  मिनिटाला गाेलचे खाते उघडले. त्यामुळे बार्सिलाेनाला १-० ने अाघाडी मिळवून देत त्याने चांगली सुरुवात करून दिली. ४० व्या मिनिटाला पीएसजीच्ये लेविन कुर्जावाने अात्मघातकी गाेल करून बार्सिलाेनाला २-० ने अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५० व्या मिनिटाला मेसीने पेनल्टीवर गाेल करून अाघाडीला ३-० ने मजबूत केले.   
 
कावानीने राेखली अाघाडी : ६२ व्या मिनिटाला  कावानीने  पीएसजीकडून पहिला गाेल केला. या गाेलमुळे बार्सिलाेनाची अाघाडी राेखल्या गेली. त्यामुळे बार्सिलाेनाला पुढच्या फेरीतील प्रवेशासाठी तीन गाेलची गरज हाेती. 
 
नेमारमुळे अाशा पल्लवित : ८८ व्या मिनिटाला फ्री किकवर नेमारने गाेल करून पुढच्या फेरीतील प्रवेशाच्या अाशा पल्लवित केल्या. त्यानंतर त्याने तिसऱ्याच मिनिटाला वैयक्तिक दुसरा गाेल केला. 
 
१०० गाेलची शर्यत 
मेसीचे चॅम्पियन्स लीगमध्ये ९४ गाेल झाले अाहेत. दुसरीकडे रिअल माद्रिदच्या राेनाल्डाेचे ९५ गाेल अाहेत. अाता या दाेन्ही खेळाडूंमध्ये १०० गाेल करण्याची शर्यत रंगणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...