आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताहिरच्या मुलासोबत खेळला धोनी; फोटो झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. या वेळी तो मैदानातील प्रदर्शनामुळे नव्हे, तर मैदानाबाहेरील आपल्या सामान्य वागणुकीने चर्चेत आहे. धोनी आयपीएलमध्ये पुणे संघाचा सदस्य असून पुण्याचा सहकारी खेळाडू इम्रान ताहिरच्या मुलासोबत खेळताना धोनीचा फोटो व्हायरल झाला आहे.
 
ताहिरच्या मुलासोबत खेळण्यासाठी धोनी चक्क फरशीवर बसला आणि खेळू लागला. हा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो विमानतळावरील दिसत आहे. विमानतळावर द. आफ्रिकेचा क्रिकेटपटू ताहिर आपल्या मुलासोबत हजर होता. ताहीरच्या मुलाला बघतच धोनी त्याच्यासोबत खेळू लागला. धोनी पुणे संघाचा कर्णधार नसला तरीही कर्णधार स्मिथसमवेत विदेशी खेळाडू बेन स्टोक्स आणि ताहिरसुद्धा त्याची संघातील भूमिका प्रमुख असल्याचे कबूल करतात. संघात हजर असलेल्या भारतीय खेळाडूंत धोनीच सर्वात सीनियर आहे.
बातम्या आणखी आहेत...