आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा; फेडरर, वावरिंका, सिमाेनाची अागेकूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राॅजर फेडरर, सिमाेना हालेप अाणि स्टॅनलिस वावरिंकाने फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. या तिन्ही अव्वल टेनिसपटूंनी अापापल्या गटातील लढतीमध्ये राेमहर्षक विजयाची नाेंद केली.

फेडररने राखले वर्चस्व
स्विसकिंग राॅजर फेडररने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात विजय संपादन केला. याशिवाय त्याने काेलंबियाच्या अलेजांद्राे फल्लाविरुद्ध सामन्यातील अापले वर्चस्व अबाधित ठेवले. त्याने फल्लाला तीन सेटमध्ये धूळ चारली. त्याने ६-३, ६-३, ६-४ ने सामना जिंकला. यासह त्याने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फेडररचा काेलंबियाच्या खेळाडूविरुद्धचा अाठ सामन्यातला हा सलग अाठवा विजय ठरला.

स्टॅनची ९६ मिनिटांची झंुज
अाॅस्ट्रेलियन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने ९६ मिनिटे झुंज देत सलामी सामन्यात विजयश्री खेचून अाणली. त्याने तुर्कीच्या मार्सेल इलहानवर ६-३, ६-२, ६-३ अशा फरकाने मात केली.
सिमाेनाची राेडिनावर मात
तिसऱ्या मानांकित सिमाेना हालेपने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. तिने रशियाच्या इवेगुनिया राेडिनाचा पराभव केला. २०१४ च्या उपविजेत्या सिमाेनाने रंगतदार सामन्यात ७-५, ६-४ ने मात केली. यासाठी तिला जागतिक क्रमवारीत ९१ व्या स्थानावर असलेल्या राेडिनाने चांगलेच झुंजवले. तिने पहिल्या सेटमध्ये सिमाेनाला राेखण्यासाठी चाेख प्रत्युत्तराची खेळी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...