आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रँडस्लॅम स्पर्धेत रॉजर फेडररने जिंकला 317 वा सामना, सानियाचा डबल धमाका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- सात वेळेसचा चॅम्पियन स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात फेडररने जर्मनीच्या मिश्चा ज्वेरेवला सरळ सेटमध्ये ७-६, ६-४, ६-४ ने हरवले. आता त्याचा सामना १३ वा मानांकित बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवशी होईल. दिमित्रोवने इतर एका सामन्यात इस्त्रायलच्या डुडी सेलाला हरवले. महिला गटात वोज्नियाकी, रदांवास्काने विजय मिळवत पुढची फेरी गाठली. भारताच्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत विजय मिळवून आगेकूच केली.
 
ग्रँडस्लॅममध्ये फेडररचा हा ३१७ वा विजय ठरला. यासह तो ग्रँडस्लॅम स्पर्धांत सर्वाधिक विजय मिळवणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सच्या (३१६) नावे होता. पुरुष खेळाडूंत फेडरर आधीपासूनच नंबर वन आहे. विम्बल्डनच्या कोर्टवर फेडररने आतापर्यंत ८७ विजय मिळवले आहेत. 
 
मिलाेस राअाेनिककडून रामाेसचा पराभव : कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने २ तास २२ मिनिटांच्या लढतीमध्ये २५ व्या मानांकित अल्बर्ट रामाेस-विनाेलासचा पराभव केला. त्याने ७-६, ६-४, ७-५ अशा फरकाने सामना अापल्या नावे केला. यामुळे त्याला अंतिम १६ मधील अापला प्रवेश निश्चित करता अाला.
 
रादांवास्का, वोज्नियाकी विजयी : महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत नवव्या मानांकित अग्निजस्का रादांवास्काने स्वित्झर्लंडच्या तिमेयाला ३-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले. पाचव्या मानांकित कॅराेलिना वाेज्नियाकीने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत राेमहर्षक विजय मिळवला. तिने लढतीमध्ये इस्टाेनियाच्या अनेटटा काेतांवेइटवर मात केली. तिने ३-६, ७-६, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. 
 
सानियाचा डबल धमाका 
भारताची स्टार महिला खेळाडू सानिया मिर्झाने स्पर्धेत विजयाचा डबल धमाका उडवला. सानियाने मिश्र दुहेरीत क्राेेएशियाचा अापला सहकारी इवान डाेंडिगसाेबत दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला. या चाैथ्या मानांकित जाेडीने लढतीत युसुके वातानुकी-मकाेताे निमाेमियाचा पराभव केला. त्यांनी १ तास १८ मिनिटांत ७-६, ६-२ ने सामना जिंकला. त्यापाठाेपाठ तिने महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत कर्स्टन फ्लिपकेंन्ससाेबत बाजी मारली. या जाेडीने लढतीत नाअाेमी ब्राडी-हिथर वाॅटसनवर मात केली. त्यांनी ६-३, ३-६, ६-४ ने विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...