आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात-पायाविना जन्मली; बालपणापासून रग्बी, फुटबॉल, हॉकी खेळते..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅस्टरडॅम -  हा फोटो कॅनडाच्या ३० वर्षीय लिंडसे हिल्टनचा आहे. हा फोटो बरेच काही सांगून जातो. एखादा माणूस काही करू शकत नसेल तर त्याचे काही कारण असू शकते. मात्र, हा फोटो बघितल्यानंतर कारण नव्हेतर बहाणेच असू शकतात, असे म्हणता येईल. हिल्टन जन्मली तेव्हा तिला पूर्ण हातपाय नव्हते. 
 
अपंग जन्मली. मात्र, निराश झाली नाही. प्राथमिक शळेत फुटबॉल खेळू लागली. हायस्कूलमध्ये येईपर्यंत तिने हॉकी, रग्बी खेळण्यास सुरुवात केली. नंतर जलतरणही सुरू केले. हे सर्व करण्यासाठी तिच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती होती. कॉलेजनंतर ती वेटलिफ्टिंग आणि कार्डिओ करू लागली. साखळीच्या मदतीने ती वजन उलचते. ती १०० पाउंड (४५.३ किलो) वजन उचलू शकते.
 
इतरांपेक्षा वेगळे समजले नाही
माझे बालपण जबरदस्त होते. माझे शिक्षक, कोच मला नेहमी प्रेरित करायचे. जीवनात जोखीम घेण्याचे त्यांनीच बळ दिले. यामुळे मी स्वत:ला कधीच इतरांपेक्षा वेगळे समजले नाही, असे हिल्टन म्हणते.
 
बातम्या आणखी आहेत...