आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिंधूनंतर महिलांमध्ये गुणवत्तेचा अभाव’, प्रकाश पदुकोन यांची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सायना नेहवालने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्यापासून भारतात गेल्या दशकात पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन या खेळाकडे युवा पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे, असे असतानाही पी. व्ही. सिंधू या आंतरराष्ट्रीय खेळाडूनंतर महिलांमध्ये जागतिक गुणवत्तेच्या बाबतीत प्रचंड पोकळी असल्याची खंत आज भारताचे माजी बॅडमिंटनपटू व ऑल इंग्लंड चॅम्पियन प्रकाश पदुकोन यांनी येथे व्यक्त केली. टाटा ओपन इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेची माहिती देताना ते बोलत होते.

मुंबईत ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, श्रीलंका, नेपाळ व व्हिएतनामचे सुमारे २१० स्पर्धक सहभागी होत आहेत.

प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकॅडमीच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेची माहिती देताना पदुकोन यांनी सांगितले, ‘या स्पर्धेच्या विजेत्यांना १५ हजार अमेरिकन डॉलर्सचा रोख पुरस्कार दिला जाईल. बक्षिसाची रक्कम स्पर्धेला दर्जात बढती मिळाल्यानंतर वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल’ पदुकोन यांनी या वेळी बाेलताना सांगितले.
पदुकाेन यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
{ प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीने गतसालीच दोन दशके पूर्ण केली. या दरम्यान १५, १७, १९ वर्षांखालील वयोगटातील अनेक गुणवत्तावान खेळाडू देशाला दिले.
{ आज देशाला सीनियर गटात अव्वल जागतिक दर्जाचे खेळाडू देणारा गोपीचंद आमच्याच अकादमीत १९९७-९८ च्या हंगामात आला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय विजेता होता. आज तोच गोपीचंद ऑल इंग्लंड चॅम्पियन, ऑलिम्पिक विजेते त्याच्या हैदराबाद येथील अकॅडमीत घडवत आहे.
{ गुणवत्ता शोधून त्याला आकार देण्यासाठी मी व गोपीचंद अकादमीने कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. मी १४-१५ वयापासून १९ वयोगटातील मुलांना प्रशिक्षित करतो. संघर्ष व गुणवत्तेची ओढाताण होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
{ आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. बॅडमिंटनमधील गुणवत्ता छोट्या छोट्या शहरांमधून पुढे येत आहे. खेळाच्या विकासाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. बॅडमिंटन ही यापुढे मोठ्या शहरांची मक्तेदारी राहणार नाही.
{ १३ ते १४ पासून १९ ते २० वयोगटात पोहोचेपर्यंत प्रकाश पदुकोन अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर गुणवत्तेत वाढ होईल.
बातम्या आणखी आहेत...