आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झा-बारबाेराची महिला दुहेरीत विजयी सलामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन वेल्स - भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने सत्रातील अापल्या किताबाच्या माेहिमेला शुक्रवारी दमदार सुरुवात केली. तिने अापली सहकारी खेळाडू बारबाेेरा स्ट्रायकाेवासाेबत इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. या चाैथ्या मानांकित जाेडीने महिला दुहेरीच्या सलामी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यांनी पहिल्या फेरीत जर्मनीच्या युलिया जाॅर्जिस अाणि लात्वियाच्या येलेना अाेस्टापेंकाेचा पराभव केला. सानिया अाणि बारबाेराने ६-३, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयाच्या बळावर त्यांनी ७५ मिनिटांमध्ये दुसऱ्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. या जाेडीला अाता या स्पर्धेत किताबाची अाशा अाहे. त्यांनी गत अाठवड्यात दुबई अाेपनमध्ये महिला दुहेरीचे उपविजेतेपद पटकावले. अाता जेतेपदावर नाव काेरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यासाठी सरस खेळी करण्यावर त्यांचा भर असेल.  
चाैथ्या मानांकित सानिया अाणि बारबाेराने दमदार सुरुवात करताना सहज पहिला सेट जिंकला. त्यांनी ६-३ ने बाजी मारून अाघाडी मिळवली. त्यांनी अाक्रमक खेळी करताना हे यश खेचून अाणले. त्यानंतर त्यांनी लय कायम ठेवताना दुसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला. 
 
दुसऱ्या फेरीत सानियासमाेर सारा   
महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये सानिया अाणि बारबाेरा यांच्यासमाेर सारा इराणी-एलिजा राेसाेल्का असतील. सारा अाणि एलिजाने सलामी सामन्यात बिगरमानांकित वाराकाेवा-मुहांमदचा पराभव केला. त्यांनी ६-१, ६-४ अशा फरकाने सामना जिंकून दुसरी फेरी गाठली. मात्र, अाता त्यांच्यासमाेर चाैथ्या मानांकित जाेडीचे तगडे अाव्हान असेल.
 
यांकाेविक, पेत्काेविक दुसऱ्या फेरीत दाखल
सर्बियाच्या जेलेना यांकाेविक अाणि अांद्रे पेत्काेविकने एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. यांकाेविकने  फालकाेनीवर  ६-२, ३-६, ६-३ ने मात केली.  पेत्काेविकने अमेरिकेच्या  किंगला बाहेर केले. तिने ६-०, २-० ने सामना नावे केला.  दुखापतीमुळे किंगने माघार घेतली.
 
राेहन बाेपन्नासमाेर याेकाेविकचे अाव्हान 
राेहन बाेपन्नाला पुरुष दुहेरीच्या सलामीला माजी नंबर वन नाेवाक याेकाेविकच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. बाेपन्ना- पाब्लाे क्युवास व याेकाेविक-व्हिक्टर यांच्यात सलामीचा सामना रंगणार अाहे.  दुहेरीच्या किताबावर नाव काेरण्यासाठी नाेवाक याेकाेविक उत्सुक अाहे.
 
डेल पेत्राेसाेबत पेस खेळणार 
भारताच्या अनुभवी टेनिसस्टार लिएंडर पेसला दुहेरीत किताबाची अाशा अाहे. त्याने अर्जेंटिनाच्या जुअान मार्टिन डेल पेत्राेसाेबत खेळण्याचा निर्णय घेतला. ही जाेडी स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत नशीब अाजमावणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...