आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाॅलिम्पिक पात्रता बाॅक्सिंग : नीरजचे अाॅलिम्पिक तिकीट एका पावलावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेनेझुएला - डब्ल्यूबीसी एशियन चॅम्पियन बाॅक्सर नीरज गाेयात अागामी रिओ अाॅलिम्पिक स्पर्धेच्या तिकिटापासून अवघ्या एका पावलावर अाहे. त्याने अांतरराष्ट्रीय असाेसिएशनच्या अाॅलिम्पिक पात्रता बाॅक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अाता एका विजयाच्या बळावर ताे अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार अाहे. याशिवाय त्याला स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करता येईल. येत्या ५ अाॅगस्टपासून ब्राझीलमध्ये िरअाे अाॅलिम्पिक स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे.

भारताच्या २४ वर्षीय युवा बाॅक्सर नीरजने ६९ किलाे वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. त्याने लढतीत ग्रीसच्या दिमित्रिअाेस पाेऊलीकाेसचा पराभव केला. नीरजने ३-० अशा फरकाने सामना जिंकला. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला प्रत्युत्तराची एकही संधी मिळू दिली नाही. सामन्यात पूर्णपणे अापला दबदबा कायम ठेवत त्याने विजयश्री खेचून अाणली. या विजयाच्या बळावर त्याला अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला.
भारताच्या नीरजचा उपांत्य सामना अाता दुसऱ्या मानांकित अार्जिक मारटजानशी हाेईल. जर्मनीचा अार्जिक हा युराेपियन चॅम्पियनशिपमधील माजी राैप्यपदक विजेता बाॅक्सर अाहे. त्यामुळे हा सामना अधिकच राेमांचक हाेण्याची शक्यता अाहे. सध्या भारताचा बाॅक्सर नीरजही जबरदस्त फाॅर्मात अाहेे. त्यामुळे त्याच्याकडून अाता अंतिम चारमधील सामन्यात अव्वल कामगिरीची अाशा अाहे. त्याचे लक्ष विजयासह रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश निश्चित करण्याकडे लागलेले असल्याचे दिसते.
दिलबाग, गाैरव अपयशी
भारताच्या दिलबाग सिंग अाणि गाैरव बिधुरीला स्पर्धेत सपशेल अपयशाला सामाेरे जावे लागले. या दाेन्ही युवा खेळाडूंना अापापल्या गटाच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मालदाेवाच्या पेट्रयूने ८१ किलाे वजन गटात दिलबागचा पराभव केला.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...