आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांत प्रथमच भारत टॉप-100 मध्ये, आफ्रिकन संघ मलावीच्या पराभवाचा झाला फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यानंतर सहाव्यांदा भारत टॉप-१०० मध्ये - Divya Marathi
स्वातंत्र्यानंतर सहाव्यांदा भारत टॉप-१०० मध्ये
नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) ताज्या क्रमवारीत टॉप-१०० मध्ये स्थान मिळवले आहे. मागच्या २१ वर्षांत भारतीय फुटबॉल संघ प्रथमच टॉप-१०० मध्ये दाखल झाला आहे, तर स्वातंत्र्यानंतर टॉप-१०० मध्ये स्थान मिळवण्याची ही भारताची सहावी वेळ ठरली आहे. भारतीय फुटबॉल संघ लिथुआनिया, निकारागुवा, अॅस्टोनिया यांच्यासोबत संयुक्तपणे १०० व्या क्रमांकावर विराजमान आहे. एप्रिल १९९६ नंतर फिफाच्या क्रमावारीत भारताची ही सर्वश्रेष्ठ रँकिंग आहे. तेव्हासुद्धा भारत १०० व्या क्रमांकावरच होता. भारतीय फुटबॉल संघाची सर्वोत्तम क्रमवारी ९४ अशी आहे. फेब्रुवारी १९९६ मध्ये भारत ९४ व्या क्रमांकावर होता. आशियाई देशांच्या एएफसी रँकिंगमध्ये भारत ११ व्या क्रमांकावर आहे.   
 
भारताने या एप्रिल महिन्यात एकही सामना खेळला नाही, तरीही भारताला क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. आफ्रिकन नेशन्स चॅम्पियन्सशिपमध्ये मलावी संघाचा आपल्यापेक्षा कमी रँकिंगच्या मेडागास्करकडून दोन सामन्यांत पराभव झाला. स्पर्धेच्या वेळी मलावी संघ १०० व्या आणि मेडागास्कर १२० व्या क्रमांकावर होता. या पराभवामुळे मलावी संघाचे ४२ गुणांचे नुकसान झाले. आता मलावी टीम क्रमवारीत ११४ व्या क्रमांकावर घसरली आहे. मलावी संघाच्या पराभवाचा फायदा भारताला झाला. आता भारतीय फुटबॉल संघा एका स्थानाच्या प्रगतीसह १०० व्या क्रमांकावर पोहोचला आहे.   
 
फिफा रँकिंगमध्ये जगातील टॉप-१० संघात कोणताच बदल झालेला नाही. ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, चिली, कोलंबिया, फ्रान्स, बेल्जियम, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड आणि स्पेन जगातल्या टॉप-१० संघात सामील आहे. भारताने आपल्या अखेरच्या १३ पैकी ११ सामन्यांत विजय मिळवला आणि ३१ गोल केले. भारताला मे महिन्यात एकही सामना खेळायचा नाही. आता भारतीय फुटबॉल संघाला थेट ७ जून रोजी लेबनॉन आणि १३ जून रोजी किर्गिज रिपब्लिकसोबत लढायचे आहे.
बातम्या आणखी आहेत...