आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या दोन संघांतील वादामुळे खेळाडूंवर अन्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - येथे आयोजित राष्ट्रीय कयाकिंग व केनोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन संघ सहभागी झाले आणि दोन्ही संघांनी प्रवेशासाठी दावा केल्याने एकच गोंधळ उडाला. दत्ता पाटील यांच्या पुरुष संघाला स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली, तर वर्षा शिंदे यांच्या संघाला प्रवेश नाकारण्यात आला.

दिवसभरात खेळाडूंना प्रलोभन दाखवून महाराष्ट्र कयाकिंग आणि कनोइंन संघटनेच्या उपाध्यक्ष वर्षा शिंदे यांच्याविरुद्ध निवेदन दिल्यास महिला खेळाडूंना खेळू दिले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, खेळाडूंनी या गोष्टीला विरोध केला. शिंदे यांच्या संघात शीतल बालाजी ही खेळाडू आपल्या १० महिन्यांच्या बाळासह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. या स्पर्धेसाठी मोठी मेहनत घेतली होती आणि पदकदेखील जिंकण्याचा विश्वास तिने व्यक्त केला. मात्र, ती खेळू देण्याची वाट पाहत आहे. महिला पाटील यांच्या संघाकडून खेळण्यास तयार असतील तर त्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे आयोजकांनी म्हटले.

मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस
महाराष्ट्राच्या कनोइंग व कयाकिंग संघटनेच्या उपाध्यक्षा वर्षा शिंदेे यांनी नियमाविरुद्ध संघटनेला निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली अाहे. न्यायालयाने नोटिसीद्वारे भारतीय संघटना, क्रीडा मंत्रालय यांना उत्तर मागितले असता भारतीय संघटना नियमानुसार राज्य संघटनांना निलंबित करू शकत नसल्याचे स्पष्ट केले.