आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमान भारताविरुद्ध खाे-खाे मालिका; इंग्लंडचा 27 जानेवारीपासून भारत दाैरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - इंग्लंडचा पुरुष संघ लवकरच खाे-खाे मालिका खेळण्यासाठी भारताचा दाैरा करणार अाहे. येत्या २७ जानेवारी राेजी इंग्लंडचा संघ मालिकेसाठी भारतामध्ये दाखल हाेईल. या दाैऱ्यामध्ये  भारत अाणि इंग्लंड यांच्यात ८ सामन्यांच्या मालिकेचे अायाेजन करण्यात अाले. खाे-खाे मधील अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी इंग्लंडच्या टीमने खास भारत दाैऱ्याचे अायाेजन केले अाहे.  या मालिकेची अधिकृत घाेषणा मंगळवारी हाेणार अाहे. यासाठी साेमवारी अखिल भारतीय खाे-खाे महासंघाची बैठक अायाेजित करण्यात अाली. यात मालिका व राष्ट्रीय संघाची घाेषणा करण्यात येईल. इंग्लंडचा दाैरा २७ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान अायाेजित करण्यात अाला.  
 
मुंबई, दिल्ली, जयपूरात सामने  भारत-इंग्लंड खाे-खाे मालिकेला मुंबईच्या मैदानावर सुरुवात हाेईल. २७ ते २९ जानेवारीदरम्यान मुंबईमध्ये या दाेन्ही संघांमध्ये दाेन सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले. त्यानंतर ३० जानेवारी राेजी इंग्लंड अाणि भारत यांच्यातील सामन्यांना जयपूरमध्ये सुरुवात हाेईल. या ठिकाणी ४ फेब्रुवारीपर्यंत सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले. तसेच ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान या दाेन्ही संघांतील सामने दिल्लीमध्ये हाेतील.   
 
महाराष्ट्राची टीम इंग्लंडविरुद्ध खेळणार 
भारत दाैऱ्यावर येणाऱ्या इंग्लंडच्या पुरुष संघाविरुद्ध सामना खेळण्याची संधी महाराष्ट्राच्या दाेन संघांना मिळणार अाहे. इंग्लंड अाणि महाराष्ट्राच्या दाेन्ही संघांमध्ये दाेन प्रदर्शनीय सामन्यांचे मुंबईमध्ये मॅटवर अायाेजन करण्यात अाले. यासाठी अव्वल दाेन संघांची निवड केली जाणार अाहे.
 
इंग्लंड दाैऱ्याचे वेळापत्रक 
- २७ ते २९ जानेवारी     मुंबई
- ३० जानेवारी ते ०४ फेब्रुवारी     जयपूर
- ५ ते ९ फेब्रुवारी     दिल्ली
- २७ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान  दाेन्ही संघांमध्ये हाेतील एकूण ८ सामने