आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार नतालिया बुडाली ? चार दिवसांपूर्वी बेपत्ता; डायव्हिंगला गेली होती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- फ्री डायव्हिंगची (महिला पाणबुडी) सुपरस्टार नतालिया मोलचानोवाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशियाची ५३ वर्षीय नतालिया रविवारपासून बेपत्ता आहे. आयबिजा येथील स्पॅनिश आयलँड फॉमेंटेरात डायव्हिंगसाठी ती गेली होती. मात्र, अद्याप परतलेली नाही.

नतालियाला शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र, ती समुद्राच्या तळाला शक्तिशाली लाटांत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नतालियाला डायव्हिंगची आवड वेड लागेल इतकी जास्त होती.
तिने आपले संपूर्ण जीवन डायव्हिंगलाच समर्पित केले. युवा असताना ती जलतरणपटू होती. नंतर कुटुंबासाठी तिने खेळ सोडला. २० वर्षांनंतर पुन्हा डायव्हिंगला सुरुवात केली आणि रशियन फ्री डायव्हिंग असोसिएशनची ती अध्यक्ष बनली.

९ मिनिटे श्वास रोखू शकते
नतालियाचे कुटुंब आणि ग्लोबल फ्री डायव्हिंग फेडरेशनच्या माहितीनुसार ती जगातली सर्वोत्तम फ्री डायव्हर होती. तिच्या नावे ४१ विश्वविक्रम आहेत. पाण्यात तब्बल ९ मिनिटे श्वास रोखून ठेवण्यात ती प्रवीण होती.
बातम्या आणखी आहेत...