आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय युवा बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनगर- येथे झालेल्या ३२ व्या राष्ट्रीय युवा बास्केटबॉल स्पर्धेत सोमवारचा दिवस पावसाने गाजवला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे आयोजकांना अखेर संयुक्त विजेते घाेषित करावे लागले. यात मुलांमध्ये तामिळनाडू-दिल्ली तर मुलींमध्ये तामिळनाडू-छत्तीसगड विजेते ठरले. मुलींमध्ये महाराष्ट्राने पंजाबला ५१-४२ असे हरवून कांस्य पदकाची कमाई केली.
रूजूता पवार (१७), नेहा साहू (१४), श्रुती शेरेगर (१३) यांच्या सांघिक कामगिरीमुळे महाराष्ट्राने कास्यपदक पटकावले. पंजाबकडून साक्षी शर्मा (१४), लवप्रीत कौर यांची झुंज अपयशी ठरली. बास्केटबॉल महासंघाचे अध्यक्ष एम. व्यंकटेश, चिराग पारेख यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी उपविजेत्यांना ३० हजार रोख तर विजेत्यांना ७५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. गुजरात राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी आभार प्रदर्शन केले.
या स्पर्धेत मुलांमध्ये २२ तर मुलींमध्ये २१ संघांनी सहभाग नोंदवला होता. भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या अधिपत्याखाली झालेल्या या स्पर्धेत गुजरात राज्य बास्केटबॉल संघटना, यंगस्टर बास्केटबॉल क्लब आिण भावनगर संघटना यांनी संयुक्तपणे यजमानपदाची जबाबदारी पेलली.