आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडक उन्हात बास्केटबॉल खेळण्यास वेईला आई रोखायची; आता जगातला नंबर वन बॅडमिंटनपटू!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियाचा ली चोंग वेई खेळात तर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. तो आपल्या चांगल्या स्वभावामुळे सुद्धा अनेकांचा आवडता आहे. तो कोर्टवर थोडा आक्रमक दिसतो. मात्र, कोर्टवर बाहेर तो अत्यंत नम्र आणि डाऊन टू अर्थ आहे. कोर्टवर आपली काही चूक झाली असेल किंवा आपल्यामुळे कोणाचे मन दुखावले अाहे, असे त्याला वाटत असेल तर कोणाचीही माफी मागण्यास मागे नसतो. २१ ऑक्टोबर १९८१ रोजी पेरेक येथे जन्मलेला वेई आता जगातील नंबर वन शटलर आहे. आपला प्रतिस्पर्धी चीनचा लिन डॅनप्रमाणे त्याची पहिली पसंत बॅडमिंटन नव्हते. लिनला बालवणी पियानो शिकायचे होते. तसेच वेईला बालपणी बास्केटबॉल खूप आवडायचे. तो वयाच्या १० वर्षांपर्यंत बास्केटबॉल खेळत होता. मात्र, उन्हात आऊटडोअर कोर्टवर बास्केटबॉल खेळणे, हे त्याच्या आईला आवडत नसे. एके दिवशी वेई कडक उन्हात खूप वेळ बास्केटबॉल खेळत होता. आई खोर किम चोईने त्याच्या बास्केटबॉल खेळण्यावर बंदी घातली. वडिलांना बॅडमिंटन आवडायचे म्हणून त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी वेईच्या हाती पहिल्यांदा रॅकेट दिली. वडील ली आ चोई त्याच्यासह बॅडमिंटन कोर्टवर गेले. वेई शाळेनंतर बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेऊ लागला. काही दिवसांनी त्याची भेट मलेशियाचा माजी बॅडमिंटनपटू मिसबून सिदेक याच्याशी झाली. सिदेकने राष्ट्रीय संघात त्याची निवड केली. त्यावेळी वेईचे वय १७ वर्षे होते. चोंग वेईने सहकारी खेळाडू वोंग म्यू चो हिच्याशी २०१२ मध्ये लग्न केले. दोघांची २००१ मध्ये एका सराव शिबिरात भेट झाली होती. २००९ मध्ये वोंग म्यू चोने वेईवर बेइमानी केल्याचा आरोप करताना ब्रेकअप केले होते. यानंतर लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर चोंग वेईने घोषणा केली की वोंग आणि तो आता एकत्र आहेत. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्न केले. आता त्यांचे दोन मुले किंग्स्टन आणि टेरेंस आहेत.   
 
त्याच्यावर बंदी असलेले औषध सेवन केल्याप्रकरणी ८ महिन्यांची बंदीसुद्धा लागली आहे. त्याचे आत्मचरित्र ‘डेअर टू बी ए चॅम्पियन’ २०१२ मध्ये बेस्टसेलरपैकी एक होते. चोंग वेई एकेरीशिवाय मिश्र दुहेरीतही खेळतो, हे अनेकांना माहिती नाही. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर त्याला मलेशियाच्या पेनांग राज्याकडून आजीवन पेंशन सुरू झाली. त्याला मलेशियाचे नागरिक सन्मान ‘डाटो’ सुद्धा मिळाले आहे. तो अदिदास, योनिक्स, सॅमसंग, कॅफे ९९सह ८ ते १० ब्रँड एंडोर्स करतो. त्याची संपत्ती २९९ कोटी रुपये इतकी आहे. 
 
विक्रम 
-    सलग १९९ आठवडे नंबर वन राहण्याचा विक्रम  
-   मलेशियाचा ऑलिम्पिकचा (३ रौप्य) सर्वांत यशस्वी खेळाडू
-  ६५ विजेतेपद, ३ ऑलिम्पिक रौप्य, ३ ऑल इंग्लंड, ३ सुपर सिरीज  
 
पुरस्कार
-     ५ वेळा बीडब्ल्यूएफ प्लेअर ऑफ द इयर  
-     २ वेळा ऑलिम्पियन ऑफ इयर  
-     ४ वेळा नॅशनल स्पोर्ट‌्स अवाॅर्ड
बातम्या आणखी आहेत...