आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी पात्रता फेरीत जेथे गाडी आदळली, मुख्य रेसमध्येसुद्धा तेथेच गाडी झाली क्रॅश!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय- स्वित्झर्लंडची फॉर्म्युला वन टीम सॉबरचा ड्रायव्हर अँटोनिओ जियोविनाजीसाठी शांघाय इंटरनॅशनल सर्किट दुर्दैवी ठरले. अँँटोनिओ चायनीज ग्रां.प्री. एफ-१ रेससुद्धा पूर्ण करू शकला नाही. रविवारी रेसच्या वेळी त्याची कार क्रॅश झाली. ही दुर्घटना त्याच ठिकाण झाली, जेथे क्वालिफाइंग रेसमध्ये त्याची गाडी आदळली होती. 
 
क्वालिफाइंग आणि मुख्य रेसमध्ये एकाच ठिकाण गाडी क्रॅश हाेण्याचा हा योगायोग ठरला. शनिवारी क्वालिफाइंग रेसमध्ये त्याची कार सुरुवातीच्या लॅपमध्येच पिट वॉलला जाऊन भिडली. रविवारीसुद्धा त्याची कार त्याच ठिकाणी असंतुलित झाली  आणि पाचव्या  लॅपमध्ये तेथे त्याची कार क्रॅश झाली. यानंतर सेफ्टी कार ट्रॅकपर्यंत पोहोचली.

हॅमिल्टनने जिंकली रेस  
मर्सिडीझचा ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने पाचव्यांदा चायनीज ग्रां.प्री.चे िवजेतेपद पटकावले. त्याने पोल पोझिशनहून सुरुवात करताना १ तास ३७ मिनिटे आणि ३६.१६० सेकंदांचा वेळ घेतला. हॅमिल्टनचा हा या सत्रातील पहिला विजय आहे. त्याने आतापर्यंत ५४ रेस जिंकल्या आहेत. फेरारीचा जर्मन रेसर सेबेस्टियन वेटलने हॅमिल्टनपेक्षा ६.२ सेकंदाचा अधिक वेळ घेत दुसरे स्थान पटकावले. रेडबुलचा मॅक्स वर्सटापेनने तिसरे स्थान मिळवले. फोर्स इंडियाचा सर्जियो पेरेज नववे स्थान मिळवले.
बातम्या आणखी आहेत...