आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक स्पर्धा तयारीसाठी राज्याकडून 3 कोटींचा निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टोकियो (जपान) येथे २०२० मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून निवडण्यात आलेल्या राज्यातील ६१ खेळाडूंची तयारी करून घेण्यासह त्यांना इतर सुविधा देण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंजूर केला. 
 
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वित्तमंत्र्यांनी ऑलिम्पिक अभियानासाठी ३ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यास फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मंजुरी दिली आहे. 
 
 टोकियो (जपान) येथे २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निधीमधून स्पोर्ट््स सायन्स सेंटरचे नूतनीकरणासाठी ३८ लाख ७१ हजार, त्यामधील साहित्य दुरुस्तीकरिता ४ लाख ८१ हजार, तज्ज्ञ व्यक्तींच्या नियुक्तीकरिता ३७ लाख ८ हजार रुपयांचे नियोजन आहे.
बातम्या आणखी आहेत...