आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड अाणि अाॅलिम्पिक चॅम्पियन कॅराेलिना मरीनचा पुन्हा सिंधूला धक्का; हैदराबादची विजयी सलामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- वर्ल्ड अाणि अाॅलिम्पिक चॅम्पियन कॅराेलिना मरीनने अापले वर्चस्व अबाधित ठेवताना पुन्हा भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का दिला. तिने दुसऱ्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये शानदार विजय मिळवला. याच्या बळावर यजमान हैदराबाद हंटर्सने लीगमध्ये विजयी सलामी दिली. यजमानांनी सलामीला सिंधूच्या चेन्नई स्मॅशर्सवर ४-३ ने मात केली. यातून हैदराबाद टीमला लीगमधील अापल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करता अाली. अाता हैदराबादला साेमवारी लीगमध्ये अवध वाॅरियर्सविरुद्ध खेळावे लागणार अाहे. या सामन्यात बाजी मारून दुसऱ्या विजयासाठी हैदराबाद उत्सुक अाहे. 
   
सिंधूची झंुज अपयशी : रिअो अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या सिंधूने सलामीला मरीनविरुद्ध सामन्यात दिलेली झंुज अपयशी ठरली. स्पेनच्या मरीनने सामन्यात सरस खेळी करताना ११-८, १२-१४, ११-२ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. दरम्यान, सिंधूची झुंज व्यर्थ ठरली. तिने दुसऱ्या गेममध्ये बाजी मारून लढतीत बराेबरी साधली हाेती. मात्र, त्यानंतर ती तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये सपशेल अपयशी ठरली. याचा फायदा घेत मरीनने गेम जिंकून सामना नावे केला. यापूर्वी मरिनने रियाेच्या फायनलमध्ये सिंधूवर मात केली हाेती. त्यानंतर सिंधूने दुबईत मरिनला हरवले हाेते. 

चेन्नईची घेतली हाेती अाघाडी :  टाॅमी सुगियार्ताने पिछाडीवर पडलेल्या चेन्नईकडून शानदार विजय मिळवला. यासह त्याने चेन्नईला १-१ ने बराेबरी मिळवून दिली. टाॅमीने पुरुष एकेरीच्या सामन्यात हैदराबादच्या बी. साई प्रणीतला ११-६, ११-८ ने पराभूत केले. त्यामुळे ही लढत बराेबरीत अाली. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या ट्रॅम्प लढतीत बाजी मारून चेन्नई संघाने लढतीत दाेन गुणांची कमाई केली.  क्रिस एडकाॅक अाणि गॅब्रियलने मिश्र दुहेरीच्या सामन्यात हैदराबादच्या सात्त्विक साई अाणि चाऊ हाेईवर ११-७, ११-९ ने मात केली. त्यामुळे चेन्नईने ३-१ ने अाघाडी मिळाली हाेती.  

राजीवची बुनसुकवर मात
पिछाडीवर पडलेल्या हैदराबादला राजीव अाेसेफने विजयी ट्रॅकवर अाणले. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीत चेन्नईच्या टीएस बुनसुकवर मात केली. त्याने ६-११, ११-८, ११-६ ने सामना जिंकला. त्यामुळे हैदराबादला एका गुणांचा फायदा झाला. मात्र, त्यानंतर पुरुष दुहेरीच्या ट्रॅम्प सामन्याने हैदराबादला सावरले. हैदराबादच्या खेळाडूंनी दुहेरीचा सामना जिंकला. बुन हाेंनाग अाणि वी किनाेंगने दुहेरीच्या लढतीत चेन्नईच्या सुमीत रेड्डी-काेल्डिंगवर ११-७, ११-८ ने मात केली. त्यामुळे यजमानांना ४-३ ने विजय संपादन करता अाला.
बातम्या आणखी आहेत...