आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटणा पायरेट‌्स सेमीफायनलमध्ये, गतविजेत्या जयपूर पिंक पँथरचा २६-२४ ने पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पाटणा पायरेट‌्सने शानदार प्रदर्शन करत गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सवर अवघ्या दोन गुणांनी रोमांचक विजय मिळवला. बुधवारी झालेल्या उपांत्य पूर्व लढतीत पाटनाने जयपूरला २६-२४ अशा गुण फरकाने पराभूत केले. या विजयासह पाटनाने प्रो कबड्डी लीगच्या सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश केला.

आता २१ ऑगस्ट रोजी सेमीफायनलमध्ये पाटणा समोर यू मुंबाचे आव्हान असेल. पाटणाने १४ सामन्यामध्ये सातवा विजय मिळवला. ४१ गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी पाटना आणि जयपूर यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. यात अखेर पाटणाने बाजी मारली. जयपूरचा संघाला १४ पैकी ७ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि संघाची पाचव्या स्थानावर घसरण झाली. स्पर्धेबाहेर पडलेल्या जयपूरचे ३८ गुण झाले आहेत.
पाटणाच्या विजयात डिफेंसच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. संघातील राजेश नरवाल, सोनू नरवाल, कर्णधार संदीप नरवाल, अमित हुड्डा, गुरूविंदर सिंग, विदेशी खेळाडू तेई डियॉक इयोम आणि दीपक नरवाल यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
उद्याचे सामने शुक्रवारी पाटणा पायरेट‌्सविरुद्ध यू मुंबा यांच्यात लढत होईल. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून फायनलमध्ये धडक मारण्यासाठी हा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. तेलुगू टायटन्ससमोर बंगळुरू बुल्स संघाचे आव्हान असेल. या दोन्ही संघातील हा दुसरा उपांत्य सामना रंगले. चारही संघ मजबूत असल्याने रोमांचक लढत पाहायला मिळेल.