आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीग : पाटणा पायरेट्सचा ३५-१८ ने पराभव, यू मुंबा, बंगळुरू फायनलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गत उपविजेत्या यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स संघाने शुक्रवारी दुसऱ्या सत्राच्या प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली. यजमान यू मुंबा टीमने लीगमधील दुसऱ्या उपांत्य लढतीत शानदार विजयाची नोंद केली. अनुप कुमारच्या नेतृत्वात मुंबा टीमने घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा ३५-१८ अशा फरकाने पराभव केला.
यासह मुंबाने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. सुरेंदर नाडा (१०) अाणि शब्बीर बापूने (५) केलेल्या शानदार खेळीच्या बळावर मुंबाने सामन्यात एकतर्फी विजय नाेंदवला. तसेच अनुप कुमार (४), जिवा कुमार (४), रिशांक देवडिगाने (४) संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे मुंबाला अापल्या घरच्या मैदानावर विजयी माेहीम अबाधित ठेवता अाली. दुसरीकडे पाटणा पायरेट्सकडून दिग्गज खेळाडूंना समाधानकारक खेळी करता अाली नाही. अमित हुडाने टीमकडून सर्वाधिक ५ गुणांची कमाई केली.
रविवारी फायनल : येत्या रविवारी दुसऱ्या सत्राच्या लीगची फायनल रंगणार अाहे. या फायनलमध्ये गत उपविजेता यू मुंबा अाणि बंगळुरू बुल्स समाेरासमाेर असतील. गतवर्षी फायनल गाठणाऱ्या मुंबाला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते.
बंगळुरूची तेलुगू टायटन्सवर मात!
मंजित चिल्लरच्या नेतृत्वात बंगळुरू बुल्स संघाने शुक्रवारी दुसऱ्या सत्रातील प्राे कबड्डी लीगच्या फायनलमध्ये धडक मारली. या टीमने लीगमधील पहिल्या उपांत्य लढतीत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. बंगळुरूने सामन्यात तेलुगू टायटन्सचा ३९-३८ अशा फरकाने पराभव केला. यासह या टीमला यंदा जेतेपदाचा अापला दावा मजबूत करता अाला. अखेरच्या काही सेकंदांत बंगळुरू बुल्सच्या चढाईपटूने तेलुगूचे दाेन गडी मारून ३९-३७ अशी अाघाडी घेतली. त्यानंतर तेलुगूच्या चढाईपटूने शेवटच्या काही सेकंदांत बंगळुरूविरुद्ध एक गुण मिळवला. मात्र, त्याला पराभवाचे अंतर कमी करता अाले नाही. त्यानंतर बंगळुरूने दबदबा कायम ठेवत सामना जिंकला.