आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 जानेवारीपासून प्रो कबड्डीचा दम, 11 देशांतील 26 खेळाडू होणार सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता लवकरच प्रो कबड्डीचा दम रंगणार आहे. येत्या ३० जानेवारीपासून तिसऱ्या सत्राच्या प्रो कबड्डी लीगला प्रारंभ होत आहे. आतापर्यंतच्‍या दोन सत्रातील या कबड्डीला तुफान लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सत्राचे लीग सामनेही अधिक आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले.

एका नव्या आणि भव्य अशा स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यंदाच्या या लीगमध्ये ११ देशांतील २६ आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सहभागी होतील. यंदाची ही लीग ३० जानेवारी ते ५ मार्चदरम्यान रंगणार आहे. स्पर्धेचा उपांत्य सामना चार मार्चला होईल. तसेच लीगच्या किताबासाठीचा अंतिम सामना पाच मार्च रोजी दिल्लीच्या मैदानावर होईल.
सत्रात आठ संघ आपले नशीब आजमावणार आहेत. यात एकूण १३८ खेळाडूंचा समावेश आहे.

मुम्बा-तेलुगू टायटन्स सलामी सामना : तिसऱ्या सत्राच्या प्रो कबड्डी लीगमध्ये गतविजेत्या यू मुम्बा आणि तेलुगू टायटन्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. त्यानंतर याच दिवशी दबंग दिल्ली आणि बंगळुरू बुल्स संघ समोरासमोर असतील.

जपान, ओमानचे खेळाडू
प्रो कबड्डी लीगने आता आशिया खंडाबाहेरही तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच आता तिसऱ्या सत्राच्या लीगमध्ये जपान, ओमान, थायलंड, पोलंड, इंडोनेशिया आणि केनियामधील खेळाडू सहभागी होण्‍यास उत्सुक आहेत.
सहभागी आठ संघ : तेलुगू टायटन्स, यू मुम्बा, दबंग दिल्ली, बंगळुरू बुल्स, जयपूर पिंक पँथर्स, पुणेरी पलटण, पाटणा पायरेट्स, बंगाल वॉरियर्स.