आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कुस्तीमध्ये यंदा योगी, सुशील, नरसिंग नाहीत, एक महिना ८० खेळाडूंची 'दंगल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिपत - या वेळी प्रो कुस्ती लीगमध्ये देशातील दिग्गज कुस्तीपटू सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, नरसिंग यादव सहभागी होणार नाहीत. या तिघांनी माघार घेतल्याने लीगचा रोमांच कमी होऊ शकतो. लीगच्या दुसऱ्या सत्राला १५ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. हे तिन्ही खेळाडू आपापल्या संघाचे आयकॉन खेळाडू होते. मात्र, हे तिघे यंदा लीगमध्ये खेळणार नाहीत. बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकचा पदक विजेता सुशीलकुमारने मागच्या सत्रातही सहभाग घेतला नव्हता. या वेळीसुद्धा त्याने लीगमधून बाहेर होण्याचा निर्णय घेतला, तर नरसिंग यादव डोपिंगच्या कारणांमुळे लीगमध्ये खेळण्याची शक्यता नाही.
मागच्या सत्रातील सर्वात महागडा खेळाडू योगेश्वर दत्तनेसुद्धा लीगमधून माघार घेतली आहे. योगेश्वर म्हणाला, ‘मी कुस्तीपासून दूर नाही. फक्त ब्रेक घेत आहे. कुस्ती लीगच्या वेळेसच माझे लग्न आहे. मी लीगमध्ये खेळलो तर मला मध्येच सोडावे लागेल. मला असे करायचे नाही.’ योगेश्वरचे लग्न सोनिपतची बी.ए.ची विद्यार्थिनी शीतलसोबत होत आहे. नुकताच दोघांचा साखरपुडा झाला. योगेश्वर दत्त कुस्तीमधून निवृत्ती घेत असल्याचे वृत्त ऑलिम्पिकनंतर आले होते.

प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या टप्प्याला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यात आठ संघ सहभागी होतील. या वेळी त्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन संघ अधिक सहभागी होत आहेत. ही लीग एक महिना चालेल. आयोजन स्थळेसुद्धा पाचहून आठ करण्यात आली आहेत. मागच्या वेळी ५४ खेळाडूंचे पुल होते, तर यंदा ८० खेळाडू असतील. विदेशी मल्लांची संख्या २४ हून ४० पर्यंत करण्यात आली आहे.

सुशीलपेक्षा योगेश्वर महागडा
योगेश्वर दत्त विश्व चॅम्पियन सुशीलकुमारपेक्षा महागडा खेळाडू ठरला होता. सुशीलसाठी उत्तर प्रदेशने ३८.२० लाखांची बोली लावली होती, तर योगीसाठी ३९.७० लाखांची बोली हरियाणाने लावली होती. नरसिंग यादवला बंगळुरूने ३४.५० लाखांत घेतले होते.
बातम्या आणखी आहेत...