आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानियाचे अव्वल स्थान कायम!, बाेपन्नाची दुहेरीत २३ व्या स्थानी घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टेनिस स्टार सानिया मिर्झाने महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवले. तिच्या नावे एकूण ८८८५ गुण अाहेत. अाता महिला दुहेरीत सानिया ही चेक गणराज्यच्या बार्बाेरासाेबत नशीब अाजमावत अाहे. दुसरीकडे राेहन बाेपन्नाला क्रमवारीत फटका बसला. त्याची पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत २३ व्या स्थानावर घसरण झाली. त्याचे चार स्थानांनी नुकसान झाले.

भारताची सानिया अाता रविवारपासून सुुरू हाेणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये खेळणार अाहे. या स्पर्धेत सानियाला महिला दुहेरीच्या किताबाची प्रबळ दावेदार मानल्या जात अाहे. कारण तिने नुकताच बार्बाेरासाेबत सत्रात दाेन विजेतेपद अापल्या नावे केले.

लिएंडर पेस दुहेरीत ५९ व्या क्रमांकावर
दुसरीकडे भारताच्या अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसने दुहेरीतील अापले ५९ वे स्थान कायम ठेवले. तसेच दिविज शरण अाणि पुरव राजाने क्रमवारीत दाेन स्थानांनी प्रगती साधली. त्यांनी अनुक्रमे ६६ अाणि ७० व्या स्थानावर धडक मारली. एकेरीत साकेत मिनेनीला माेठा फटका बसला. त्याची १८६ व्या स्थानावर घसरण झाली. त्याचे ३२ स्थानांनी नुकसान झाले.
बातम्या आणखी आहेत...