खेळाच्या या महाकुुंभामध्ये या वेळी १० हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी हाेण्याची शक्यता अाहे. यातील काही खेळाडू असे अाहेत, जे यापूर्वीही अाॅलिम्पिकमध्ये खेळले अाहेत. काही खेळाडूंसाठी हा पहिला अनुभव ठरेल. मात्र, यातील १० खेळाडू असे अाहेत, जे वर्ल्ड चॅम्पियन, अाॅलिम्पिक चॅम्पियन वा विक्रमवीर अाहेत. हे सर्व खेेळाडू अापापल्या खेळात पदकाचे प्रबळ दावेदार अाहेत. हेच पदक जिंकण्याची पूर्ण अाशा अाहे. चाहत्यांनाही हेच वाटते. रिअाेत ३०६ पदकांसाठी झुंज रंगणार अाहे.