आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅलिम्पिकची तयारीः रिअाे अाॅलिम्पिक हे अामचे लक्ष्य : सरदारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- अागामी रिअाे अाॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्याचे अामचे लक्ष्य अाहे. त्यासाठी खेळाडूंमधील उणिवा दूर करण्यावर अाम्ही अधिक भर देऊ. यासाठी वर्ल्ड लीग फायनलमध्ये बलाढ्य टीमशी अाम्ही दाेन हात करणार अाहाेत, अशी प्रतिक्रिया अाशिया चॅम्पियन भारतीय हाॅकी टीमचा कर्णधार सरदारा सिंग याने दिली.वर्ल्ड लीग फायनल अाणि रिअाे अाॅॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ अाॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार अाहे.
येत्या गुरुवारपासून यजमान भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ हाेईल. या मालिकेसाठी भारतीय संघ रायपूरमध्ये दाखल झाला. ही मालिका १९ ते २३ नाेव्हेंबरदरम्यान रायपूरमध्ये रंगणार अाहे. या मालिकेच्या तयारीसाठी यजमान टीमने रायपूरच्या मैदानावर सरावाला सुरुवात केली.

‘अाता अामच्याकडे फार कमी वेळ अाहे. त्यामुळे संघातील खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याचा अामचा प्रयत्न असेल. यातून अाम्हाला रिअाे अाॅलिम्पिकसाठी निर्धारीत केलेले लक्ष्य सहजरीत्या गाठता येईल. त्यासाठी अाम्ही अधिक मेहनत घेणार अाहाेत, ’असेही सरदारा सिंगने सांगितले. या मालिकेनंतर भारतीय संघ अापल्या घरच्या मैदानावर वर्ल्ड हाॅकी लीग फायनलमध्ये खेळणार अाहे. येत्या २७ नाेव्हेंबरपासून या फायनलला प्रारंभ हाेईल. भारताचा सलामी सामना अर्जेंटिनाविरुद्ध रंगणार अाहे.

अाॅस्ट्रेलियाचे तगडे अाव्हान
तीन हाॅकी सामन्यांच्या मालिकेमध्ये अाम्हाला बलाढ्य अाॅस्ट्रेलियाच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. त्यामुळे ही मालिका अामच्यासाठी अधिक खडतर अाहे. मात्र, या मालिकेत सरस कामगिरी करण्याचा अामचा प्रयत्न असेल,’ अशी माहिती सरदारा सिंगने दिली.

मालिकेचे वेळापत्रक
सामना दिनांक वेळ मैदान
पहिला सामना १९ नाेव्हेंबर दु. ३ वाजेपासून राजनांदगाव
दुसरा सामना २२ नाेव्हेंबर संध्या. ६.३० वाजेपासून रायपूर
तिसरा सामना २३ नाेव्हेंबर संध्या. ६.३० वाजेपासून रायपूर