आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झिका’ची काळजी करू नका, रिओला या! रिओ ऑलिम्पिक आयोजन समितीचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिओऑलिम्पिक आयोजन समितीने खेळाडू, पदाधिकारी आणि पर्यटकांना ‘झिका व्हायरस’ची भीती बाळगू नका, प्रशासनाने हरतऱ्हेची काळजी घेतली आहे. ‘रिओ’ला बिनधास्त या, असे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेही आपल्या सर्व देशांच्या संलग्न संघटनांना ‘रिओ’मध्ये काळजी कशी कोणती घ्यावी आणि कोणत्या लशींचे इंजेक्शन घ्यावे यासंबधी सविस्तर पत्र पाठवले आहे.

रिओ ऑलिम्पिक समितीने सर्व खेळाडू, प्रसिद्धिमाध्यमांचे प्रतिनिधी आणि ऑलिम्पिक कुटुंबातील सर्व पदाधिकारी यांना खात्री दिली आहे की ‘झिका’ व्हायरस पसरवणारे डास तुमच्यापर्यंत येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली आहे. सर्व खोल्या वातानुकूलित असून खिडक्या बंद ठेवता येतील. शिवाय खिडक्यांना मोकळ्या व्हरंड्यालाही डास आत येऊ नयेत यासाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. त्याशिवाय डासांना पळवून लावणारी उपकरणे लावण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीने पाठवली आहेत.

रिओत१०, १५ पदके जिंकू
रिओऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेले भारतीय खेळाडू यंदा विक्रमी १० ते १५ पदके जिंकतील, असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक संघटनेने व्यक्त केला आहे. बॅडमिंटनमध्ये सायना, नेमबाजीत जितू रॉय, बॉक्सिंगमध्ये कृष्णन यादव, तिरंदाजी टीम, कुस्ती, टेनिसमध्ये दुहेरीत आणि पुरुष हॉकीत आपण पदक जिंकू शकतो, असे आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...