आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सायना नेहवालची अंतिम आठमध्ये धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बासेल - दाेन वेळची चॅम्पियन सायना नेहवालने विजयी माेहीम अबाधित ठेवताना स्वीस अाेपन ग्रँड प्रिक्स गाेल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम अाठमध्ये धडक मारली. दुसरीकडे एच. एस. प्रणयनेही पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला.

अव्वल मानांकित सायनाने महिला एकेरीच्या अंतिम साेळामध्ये शानदार एकतर्फी विजयाची नाेेंद केली. तिने क्रिस्टिना गाव्हलाेटवर मात केली. तिने २१-१८, २१-१७ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने अवघ्या ३४ मिनिटांमध्ये उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. भारताच्या प्रणयने पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये इंग्लंडच्या राजीव अाेसेफवर मात केली. त्याने २१-१३, २१-१८ ने सामना जिंकला. अाता त्याचा सामना तांगाेस्काशी हाेईल.
बातम्या आणखी आहेत...