आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया-मार्टिना हिंगीस सेमीफायनलमध्ये दाखल, बारबाेरा-कॅटरिनाचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुटगार्ट - जगातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीसने शुक्रवारी पाेर्च अाेपन ग्रांप्री टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या अव्वल मानांकित जाेडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. सानिया अाणि मार्टिनाने सात लाख ५९ हजार डाॅलरचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामना ५७ मिनिटांत जिंकला. त्यांनी सामन्यात चेक गणराज्याची बारबाेरा क्रेज्सिकाेवा अाणि कॅटरिना सिनियाकाेवावर ६-१, ६-३ अशा फरकाने मात केली. यासह सानिया अाणि मार्टिनाने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. विजेत्या जाेडीने ४० पैकी ३१ सर्व्हिस गुणांची कमाई करताना सामना जिंकला. सामन्यात तसेच १२ पैकी पाच ब्रेक पॉइंट मिळवले.

दमदार सुरुवात करताना सानिया अाणि मार्टिनाने पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. अाता या जाेडीचा उपांत्य सामना जर्मनीची सेबाईन लिसिकी अाणि चेक गणराज्यच्या लुसी सफाराेवाशी हाेईल. महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात तिसऱ्या मानांकित अांद्रेजा क्लेपाक व कॅटरिना स्लेबाेत्निकला लिसिका - सफाराेवाने २-६, ६-१, १०-७ अशा फरकाने पराभूत केले.