सिडनी - यंदाच्या सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपनची तयारी करत असलेल्या माजी नंबर वन सानिया मिर्झाला अपयशाला सामाेरे जावे लागले. तिने अापल्या नव्या सहकारी बार्बाेरा स्ट्रायकाेवासाेबत अापिया अांतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. या जाेडीला महिला दुहेरीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ताइमी बाबाेस अाणि अनसतासियाने सरस खेळीच्या बळावर अंतिम सामन्यात सानिया-बार्बाेरावर ६-४, ६-४ अशा फरकाने मात केली. यासह त्यांनी सत्रात पहिल्या किताबावर नाव काेरले. मात्र, सानिया अाणि बार्बाेराला सत्रातील पहिल्याच माेठ्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनी फायनलमध्ये दिलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे या जाेडीला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे या जाेडीचा शानदार किताबाने यंंदा सत्राला चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.
अाॅस्ट्रेलियात अाशा
अाता सानिया अाणि बार्बाेराला अागामी अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेत किताबाची अाशा अाहे. यासाठी या जाेडीने कसून सराव केला अाहे. अापियामधील अपयशातून सावरत सानिया अाणि बार्बाेराला अाॅस्ट्रेलियन अाेपनमध्ये उल्लेखनीय कामगिरीची अाशा अाहे. यातून त्यांना सत्राला चांगली सुरुवात करता येईल.