आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन टेनिस स्पर्धा- सेरेना विजयी, याेकाे बाहेर, सॅम क्वेरीकडून याेकाेविकचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स अाणि पाचव्या मानांकित सिमाेना हालेपने शानदार विजयासह सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील अागेकूच कायम ठेवली. दुसरीकडे १७ वेळचा ग्रँडस्लॅम किताब विजेत्या राॅजर फेडररने पुरुष एकेरीच्या चाैथ्या फेरीत धडक मारली. जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचे अाव्हान संपुष्टात अाले. त्याला अमेरिकेच्या सॅम क्वेरीने पराभूत केले. क्वेरीने ७-६, ६-१, ३-६, ७-६ ने सनसनाटी विजयाची नाेंद केली.

चाैथ्या मानांकित वावरिंका अाणि अव्वल मानांकित याेकाेविकच्या पराभवानंतर अाता पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी फेडरर, मरेसह डेल पेत्राे अाणि डेव्हिड फेररने कंबर कसली अाहे. राेमानियाच्या सिमाेना हालेपने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत हाॅलंडच्या बेर्टेन्सचा पराभव केला. तिने ६-४, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. तिसऱ्या मानांकित फेडररने तिसऱ्या फेरीत इंग्लंडच्या इव्हान्सचा पराभव केला. त्याने ६-४, ६-२, ६-२ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. तसेच १५ व्या मानांकित कायग्राेसने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. त्याने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात इंग्लंडच्या ब्राऊनवर मात केली. त्याने६-७, ६-१, २-६, ६-४, ६-४ ने विजय मिळवला. दुसरीकडे दहाव्या मानांंकित टाॅमस बर्डिचचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्याला इंग्लंडच्या बिगरमानांकित बेकरने धूळ चारली.

सेरेनाचा राेमहर्षक विजय
सेरेनाविल्यम्सने दुसऱ्या फेरीत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. तिने सामन्यात अापल्याच देशाच्या बिगरमानांकित मॅक्लेचा पराभव केला. तिने ६-७, ६-२, ६-४ ने सामना जिंकला. मात्र, यासाठी तिला शर्थीची झंुज द्यावी लागली. पहिल्या सेटवरील अपयशातून सावरलेल्या सेरेनाने दुसऱ्या तिसऱ्या सेटवर बाजी मारली.
बातम्या आणखी आहेत...