आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धा: नदालची विजयी सलामी; सानिया मिर्झाची अागेकूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
सिनसिनाटी - १५ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने गुरुवारी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. त्याने पुरुष एकेरीच्या गटात विजयी सलामी दिली. दुसरीकडे भारतीय खेळाडूंसाठी स्पर्धेची पहिली फेरी संमिश्र यश देणारी ठरली. सानियाने महिला दुहेरीचा सलामी सामना जिंकला. दुसरीकडे भारताच्या रामकुमारला पहिल्याच फेरीत पॅकअप करावे लागले.
 
फ्रेंच अाेपन चॅम्पियन राफेल नदालने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत रिचर्ड गास्केटचा पराभव केला. त्याने ६-३, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने दुसरी फेरी गाठली. यादरम्यान त्याने सहज विजय संपादन केला. त्यामुळे गास्केटला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला प्रत्युत्तराची फारशी संधीच मिळाली नाही. यातून त्याचे विजयाचे स्वप्न भंगले. नदालला गत माॅट्रियल स्पर्धेत अपयश अाले हाेते. मात्र, या स्पर्धेच्या किताबावर नाव काेरण्याचा त्याचा मानस अाहे. यासाठी कसून मेहनत केल्याचे त्याने सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून ताे अागामी अमेरिकन अाेपनची तयारी करणार अाहे. येत्या २८ अाॅगस्टपासून अमेरिकन अाेपनला सुरुवात हाेईल.
 
रामनाथनची झुंज अपयशी
भारताच्या रामकुमार रामनाथनला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अमेरिकेच्या जारेड डाेनाल्डसनने धूळ चारली. अमेरिकेच्या खेळाडूने ६-४, २-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने पुढची फेरी गाठली. मात्र, रामकुमारला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्याने दुसरा सेट जिंकून लढतीत बराेबरी साधली हाेती. मात्र, त्यानंतर निर्णायक सेटमध्ये ताे अपयशी ठरला.
 
प्लिस्काेवा दुसऱ्या फेरीत : गतचॅम्पियन अाणि जगातील नंबर वन कॅराेलीना प्लिस्काेवाने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. तिने सलामीला रशियाच्या नताल्याचा पराभव केला. तिने ६-२, ६-३ ने सहज विजय संपादन केला.
 
कर्बरचा पराभव : तिसऱ्या मानांकित एंजेलीक कर्बरचा पराभव झाला. रशियाच्या मकाराेवाने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या कर्बरवर मात केली. तिने ६-४, १-६, ७-६ ने विजय मिळवला.

सानिया दुहेरीत विजयी
भारताच्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीत विजयी सलामी दिली. तिने सहकारी पेंगसाेबत विजयी माेहिमेला सुरुवात केली. या चाैथ्या मानांकित जाेडीने जाॅर्जेस अाणि सावचुकवर मात केली. त्यांनी ७-५, ६-४ ने विजय संपादन केला. अाता या जाेडीचा दुसऱ्या फेरीतील सामना बेगु-अाेलारू यांच्याशी हाेईल.
 
गास्केटवर १५ वा विजय
स्पेनच्याराफेल नदालने सरस खेळीच्या बळावर रिचर्ड गास्केटविरुद्ध लढतीतील अापले वर्चस्व अबाधित ठेवले. त्याने गास्केटवर १५ वा विजय मिळवला. अातापर्यंत हे दाेन्ही खेळाडू १५ सामन्यात समाेेरासमाेर अाले. यातील सर्वच सामने नदालने जिंकले.
 
बातम्या आणखी आहेत...