आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयाचे श्रेय घेतो, मात्र पराभव झाला तर जबाबदारी झटकतो...रोनाल्डोवर सहकारी खेळाडूंनी केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिद संघातील अंतर्गत कलह आता समोर येत आहे. संघाचा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो व इतर खेळाडूंत सर्वकाही सामान्य नसल्याचे चित्र आहे. 
स्पॅनिश वर्तमानपत्र डेपोर्टिवोने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रिअल माद्रिदच्या सराव सत्रादरम्यान खेळाडूंचा आपसांत वाद झाला. यात रोनाल्डोने सहभाग घेतला नाही. यामुळे खेळाडू नाराज होते. संघाचा कर्णधार सर्जियो रामोससह मार्सेलो आणि माेड्रिक आता खुलेआम बोलू लागले आहेत. काही खेळाडूंनी तर रोनाल्डोला स्वार्थी म्हटले. या खेळाडूंच्या मते रोनाल्डो आता खूप अहंकारी झाला आहे. याच्यात संघभावना सारखे काहीच शिल्लक राहिले नाही. संघ जिंकतो तेव्हा याचे पूर्ण श्रेय रोनाल्डो घेतो. मात्र, संघाचा पराभव होतो तेव्हा तो यातून जबाबदारी झटकतो आणि सर्व दोष इतर खेळाडूंच्या डोक्यावर फोडतो. काही खेळाडूंच्या मते रोनाल्डो आपल्या मर्जीने सामना खेळण्यास उतरतो. एखाद्या क्लबविरुद्ध खेळण्याची त्याची इच्छा नसेल तर तो सरावाला सुद्धा येत नाही. शनिवारी एबारविरुद्ध  माद्रिदचा सामना होता. यात ताे खेळला नाही.   

रामोस म्हणाला, ‘सामन्यात गोलसाठी संपूर्ण धावत असतो, तेव्हा एकच खेळाडू धावत नाही. तो म्हणते रोनाल्डो. हे योग्य नाही. फुटबॉल हा टीम गेम आहे. यात सर्व खेळाडूंना शंभर टक्के योगदान द्यायचे असते. एक खेळाडू असा वागत असेल तर याचा संघावर प्रतिकूल परिणाम होणे साहजिक आहे.’  
 
माद्रिद टॉपवर  
करिम बेंजेमाच्या दोन गोलच्या  बळावर रिअल माद्रिदने ला लीगामध्ये एबारला ४-१ ने हरवले. या विजयानंतर रिअल माद्रिदने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. आता त्यांच्या नावे ५९ गुण झाले आहेत. प्रतिस्पर्धी बार्सिलोनाच्या नावे ५७ गुण अाहे. बार्सिलोना दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या हाफमध्ये माद्रिद ३-० ने पुढे होती. 
बातम्या आणखी आहेत...