आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मँचेस्टर युनायटेडने 6000 किमी दूरवर असलेल्या सामन्यात समर्थनासाठी 238 चाहत्यांचा प्रवास व निवासाचा केला खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन क्लब राेस्ताेवविरुद्ध सामन्यादरम्यान मँचेस्टर युनायटेडचे चाहते. - Divya Marathi
रशियन क्लब राेस्ताेवविरुद्ध सामन्यादरम्यान मँचेस्टर युनायटेडचे चाहते.
राेस्ताेव - जगातील सर्वात लाेकप्रिय फुटबाॅल क्लबपैकी एक मँचेस्टर युनायटेडला सामान्यपणे काेणत्याही सामन्यात चाहत्यांची कमी असल्याच्या प्रकारला सामाेरे जावे लागत नाही. मात्र, यंदा युराेपा कप फुटबाॅल स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलच्या पहिल्या फेरीतील सामना खेळण्यासाठी युनायटेडला ६ हजार किमीचा प्रवास करावा लागला. कारण, राेस्ताेव येथे या सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. युनायटेडच्या व्यवस्थापनाने चाहत्यांचा सामना पाहण्यासाठी सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.  

त्यामुळे २३८ चाहत्यांना ही संधी मिळाली. एका चाहत्यांचा एकूण खर्च जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक ठरला. या सामन्यादरम्यान राेस्ताेवमध्ये कडाक्याची थंडी हाेती.  त्यामुळे चाहत्याचे समर्थन मिळण्यासाठी युनायटेडने सामन्यादरम्यान ब्लंँकेटही वाटण्याची याेजना तयार केली हाेती.
 
काय अाहे युराेपा कप 
युराेपातील वेगवेगळ्या देशांचे क्लब एकत्र येऊन लीगमध्ये खेळतात. चॅम्पियन्स लीगपेक्षाही अधिक माेठी लीग म्हणून त्याची अाेळख अाहे. चॅम्पियन्स लीगमध्ये ईपीएलचे अव्वल चार टीम असतात. युनायटेड गतवर्षी सहाव्या स्थानावर हाेती. मात्र, तरीही या क्लबने युराेपा लीगमध्ये प्रवेश केला.  
 
सुपर माॅडेलने मदतीसाठी दिला हाॅटलाइट नंबर
रशियन सुपर माॅडेल व्हिक्टाेरिया लाेपीराेवाने युनायटेड क्लबच्या चाहत्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. तिने या विदेशी पाहुण्यांसाठी स्थानिक प्रशासनासाेबत हाॅटलाइन नंबर सुरू केला. या हाॅटलाइनवर युनायटेडचे रजिस्टर्ड चाहते काेणत्याही मदतीसाठी फाेन करू शकत हाेते. लाेपिराेवा ही पुढच्या वर्षी रशियात हाेणाऱ्या फिफा वर्ल्डकपची ब्रँड अॅम्बेसेडर अाहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, युनायटेडचे  विजयाचे स्वप्न भंगले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...