आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा घाटकरने जिंकले कांस्यपदक, अायएसएसएफ विश्वचषक नेमबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी एशियन चॅम्पियन पूजा घाटकरने  अायएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी यजमान भारतीय संघाला पहिले पदक मिळवून दिले. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सरस खेळी करताना कांस्यपदक पटकावले. या पदकाच्या अाधारे यजमान भारतीय संघाला स्पर्धेत दमदार सुरुवात करता अाली.
 
 या गटामध्ये चीनची मेंगयाअाे चॅम्पियन ठरली. तिने सर्वाधिक २५२.१ गुणांची कमाई करून सुवर्णपदकाची कमाई केली. या गटात चीनच्या डाेंग लिजीने राैप्यपदक पटकावले.चीनच्या दाेन्ही महिला खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करताना दाेन पदके अापल्या नावे केली.  शुक्रवारपासून दिल्लीमधील डाॅ.कर्णी सिंग शूटिंग रेंजवर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला सुरुवात झाली.  
 
महाराष्ट्राची युवा नेमबाज पूजाने दमदार सुरुवात करताना पात्रता फेरीमध्ये ४१८ गुण संपादन केले. यामुळे तिला फायनलमधील प्रवेश निश्चित करता अाला. त्यानंतर तिने फायनलमध्ये २२८.८ गुणांची कमाई करून कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. दरम्यान चीनच्या मेंगयाअाेने सुवर्णपदकासह विश्वविक्रमाला गवसणी घातली.

स्पर्धेतील विजेते 
सुवर्ण : मेंगयाअाे शी (चीन)  
राैप्य : डाेंग लिजी (चीन)  
कांस्य : पूजा घाटकर (भारत)
बातम्या आणखी आहेत...