आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 मी. अंतरावर फिनिश लाइन असताना कोसळला; 10 वर्षांच्या मुलाने सहकाऱ्याला उचलून रेस केली पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१. वॉटसनला कुशीत उचलून फिनिश लाइनकडे जाताना ज्युलियन - Divya Marathi
१. वॉटसनला कुशीत उचलून फिनिश लाइनकडे जाताना ज्युलियन
ग्रिम्स्बी (इंग्लंड) -१० वर्षीय शाळकरी मुलाने क्रॉसकंट्री स्पर्धेच्या खेळभावनेची प्रचिती दिली. तो रेस जिंकणार होता...इतक्यात रेसदरम्यान कोसळलेल्या आपल्या सहकाऱ्याला उचलून त्याने फिनीश लाइन ओलांडली. ही घटना लिंकनशायरच्या वेल्सबी वुड्स स्कूलमध्ये इंटरस्कूल क्रॉसकंट्री स्पर्धेदरम्यान झाली. छायाचित्रकार जॉन कोरकेनने या घटनेला कॅमेऱ्यात टिपले. या घटनेने मागच्या वर्षी मेक्सिकोत झालेल्या ट्रायथलॉन वर्ल्ड सिरीजदरम्यान ब्राऊनली ब्रदर्सच्या घटनेची आठवण ताजी केली. त्या रेसमध्ये जोनाथन ब्राऊनली फिनिश लाइनच्या थोड्या आधी चक्कर येऊन कोसळणार होता. पाठीमागून त्याचा भाऊ अॅलेस्टर येत होता. अॅलेस्टरने जोनाथनला आधार दिला आणि नंतर दोघांनी एकत्र फिनिश लाइन ओलांडली. त्या वेळी अॅलेस्टरसुद्धा जिंकणार होता.    या आंतरशालेय स्पर्धेतही असेच घडले. एलर्टन प्राथमिक शाळेचा १० वर्षीय रिले वॉटसन आणि ज्युलियन ओट्यू आपापल्या शाळेचे प्रतिनिधित्व करत होते. दोघेही रेस पूर्ण करणार होते. अवघे १८ मीटरचे अंतर शिल्लक होते. इतक्यात वॉटसन मैदानावर कोसळला. ज्युलियनने त्याला सांभाळले आणि कुशीत घेतले. यानंतरचे रेसचे अंतर ज्युलियनने वॉटसनला कुशीत उचलून पूर्ण केले. ज्युलियन रेस जिंकू शकला नाही, मात्र त्याच्या खेळभावनेने सर्वांची मने जिंकली.   
बातम्या आणखी आहेत...