आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया म्हणते, ..तर जीवन थांबणार नाही : सानिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मी इतर स्पर्धांत खेळणे कमी करणार नाही. ऑलिम्पिकसुद्धा माझ्यासाठी एक स्पर्धाच आहे. यापेक्षा अधिक नाही. लोक काहीही विचार करो. ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळाल्यास जीवन थांबणार नाही, असे माझे मत आहे. त्यानंतरही मला खेळत राहायचे आहे, असे खेलरत्न पुरस्कार विजेती टेनिस स्टार महिला दुहेरीची खेळाडू सानिया मिर्झाने म्हटले आहे.
सानिया म्हणाली, "रिओ ऑलिम्पिकसाठी मिश्र दुहेरीच्या पार्टनरचा निर्णय मी स्वत: घेईन. कोर्टवर ज्या खेळाडूसोबत माझी लय जुळते त्यालाच मी पार्टनर बनवेल.'
यशात अनेकांचे योगदान :
हिंगीससोबत विम्बल्डन आणि यूएस ओपनचे महिला दुहेरीचा किताब जिंकणाऱ्या सानियाने विजयाचे योगदान सर्वांना दिले.

विजयाचे अर्धशतक
सानिया म्हणाली, "मी आणि मार्टिना हिंगीस चांगली कामगिरी करीत आहोत. आम्हा दोघींना दबाव आवडतो. महत्त्वाच्या सामन्यात खेळताना आम्ही आमचा गेम अधिक मजबूत करतो. आमचा एकमेकींवर विश्वास आहे. यामुळे आम्ही या वर्षी जवळपास ५० सामने जिंकले आहेत.'