आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीमुळे आम्ही, आमच्यामुळे कुस्ती नव्हे, योगेश्वर दत्तचे परखड मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - ज्या लोकांना वाटते की त्यांच्या नावामुळे खेळ चालतो, अशा लोकांचा हा विचार चुकीचा आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, कुस्तीमुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे कुस्ती नाही, असे ऑलिम्पिकपटू आणि खेलरत्न पुरस्कार विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने म्हटले. येथील आरकेडीएफ विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होता.
या वेळी आरकेडीएफ विद्यापीठ आणि योगेश्वर दत्त अकादमी यांच्यात करारसुद्धा झाला. यानुसार अकादमीतील दहा मल्लांचा पुढच्या ऑलिम्पिकपर्यंतचा संपूर्ण प्रशिक्षण खर्च आरकेडीएफ विद्यापीठ करणार आहे. याची घोषणा या वेळी आयकेडीएफ ग्रुपचे प्रमुख डॉ. सुनील कपूर यांनी केली. या वेळी मान्यवरांची हजेरी होती.

योगेश्वर म्हणाला, देशातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. गुणवंत खेळाडूंना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. अशाने त्या खेळाडूंना अधिकाधिक चांगले प्रशिक्षण दिले जाऊ शकेल. यामुळे आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी ते तयारी करू शकतील. खेळाडूंना आर्थिक पाठबळ देणाऱ्या इच्छुकांनी पुढे यावे, असे आवाहन त्याने केले.

मी माझी आई सुशीला देवीचा आभारी आहे. तिने मला माझ्या देशाची सेवा करण्याइतके सक्षम बनवले. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणे माझे लक्ष्य आहे, असेही या वेळी योगेश्वरने म्हटले. मी खेळू शकलो नाही, तर कमीत कमी माझ्या अकादमीतून असे खेळाडू निश्चितपणे तयार करीन, जे देशासाठी पदके जिंकू शकतील, असेही या वेळी भारताच्या अनुभवी कुस्तीपटूने म्हटले. योगेश्वर दत्त यावर्षी कुस्ती लीगमध्ये खेळणार नाही.

} अकादमीसाठी तू कुस्तीमधून माघार घेत आहेस काय?
योगेश्वर : नाही. मी सलग इतक्या वर्षांपासून कुस्तीत मेहनत घेत असून, विविध स्पर्धांत सहभागी होत आहे. मला देशासाठी काही करायचे आहे. भारताला २०२४ पर्यंत चांगले चार ते पाच पदक जिंकू शकणारे खेळाडू देण्याचा माझा प्रयत्न आहे. यामुळे मी या अकादमीवर लक्ष देत आहे.
} सुशीलकुमार प्रो-रेसलिंगमध्ये खेळू शकतो आणि नरसिंग डोपमुळे ऑलिम्पिक खेळू शकला नाही?
योगेश्वर : कुस्तीमुळे आम्ही सर्व जण आहोत. आमच्यामुळे कुस्ती मुळीच नाही, असे माझे मत आहे. आम्ही गेलो तर आणखी खेळाडू येतील. कोणी गेला किंवा नाही गेला तर फार फरक पडत नाही. कुस्तीमध्ये तर मुळीच फरक पडत नाही.
बातम्या आणखी आहेत...