आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायअाेएने सुरेश कलमाडी, चाैटालांची निवड केली रद्द, टीकेनंतर घेतला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रचंड टीकेनंतर अखेर भारतीय अाॅलिम्पिक महासंघाने (अायअाेए) मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. अायअाेएने सुरेश कलमाडी अाणि अभयसिंग चाैटाला यांच्या अाजीवन अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय रद्द केला. त्यामुळे या दाेघांनाही या पदावरून हटवण्यात अाले. याची माहिती अायअाेएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी दिली. त्यांनी कलमाडी अाणि चाैटाला यांच्या निवडीचा निर्णय रद्द झाल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयालाही दिली.  
गतवर्षी २७ डिसेंबर राेजी चेन्नई येथे अाॅलिम्पिक महासंघाची वार्षिक सभा झाली हाेती. या सभेमध्ये सुरेश कलमाडी अाणि चाैटाला यांना अाजीवन अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. मात्र, त्यानंतर अनेक सदस्यांनी या निर्णयाला प्रचंड विराेध केला हाेता.