लॉस एंजलिस - बघताक्षणी हा जगातला महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सचा पुतळा वाटतो. मात्र, हा पुतळा नसून दस्तुरखुद्द फेल्प्स आहे. निकलोडियन किड्स चॉइस स्पोर्ट््स अवार्ड सोहळ्यात त्याला लिजेंड ऑफ स्पोर्ट््सचा पुरस्कार देण्यात आला. मंचावर ट्रॉफी दिल्यानंतर फेल्प्सला सोनेरी रंगाने भिजवण्यात आले. ३२ वर्षीय मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक २३ सुवर्णपदके जिंकल्यामुळे त्याच्यावर सुवर्ण रंगाचा फवारा करून त्याला भिजवण्यात आले. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येसुद्धा त्याने २८ सुवर्णपदके जिंकली. फेल्प्सच्या नावे एकूण ६६ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके आहेत.