आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायनान्समध्ये करायचे होते एमबीए, झाला टेनिसपटू !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलोस राओनिकने मागच्या वर्षाच्या अखेरीस जगातल्या टाॅप-३ खेळाडूंत स्थान मिळवले. टॉप-३ मध्ये स्थान मिळवणारा राओनिक कॅनडाचा पहिला खेळाडू आहे. ताशी २५० किमीपेक्षा अधिक वेगाने सर्व्हिस करणाऱ्या जगातल्या अवघ्या सहा खेळाडूंपैकी एक असलेला राओनिक अभ्यासातही हुशार होता. तो टेनिसपटू नसता तर फायनान्समध्ये एमबीए झाला असता. राआेनिक अभ्यासात हुशार होता, ही चकित करणारी बाब नाही. त्याचे आई-वडील दोघेही इंजिनिअर होते. वडील दुसान राओनिक इलेक्ट्रिकल इंजिनिअर तर आई वेस्ना मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. 

तीन भावडांत मिलोस सर्वांत लहान आहे. बहीण जेलेना मिलोसपेक्षा ११ वर्षांनी मोठी असून ती फायनान्स व मार्केंटिंगची एक्स्पर्ट आहे. भाऊ मोमिर तिच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठा असून, तो आयटी आणि बिझनेस मास्टर आहे. मिलोसचा जन्म २७ डिसेंबर १९९० रोजी युगोस्लाव्हियाच्या (आताचे मोंटेनिग्रो) टिटोग्रेड येथे झाला. मिलोस चार वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी चांगल्या भविष्यासाठी मोंटेनिग्रोची राजाधानी पोडग्रोसिया येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. मिलोसची मुख्य भाषा अजूनही सर्बियन आहे. इतकेच नव्हे तर त्याचे काका ब्रानिमीर ग्वोजेंदोविच मोंअेनिग्रोचे उपपंतप्रधान राहिले आहेत. आता ते तेथील पर्यटन मंत्री आहेत. मिलाेस ६ वर्षांचा असताना त्याचा टेनिसशी परिचय झाला. त्याच्या वडिलांनी एका समर कॅम्पमध्ये त्याला टाकले. तेथे टेनिससुद्धा शिकवले जात होते. राओनिकला खेळ आवडला म्हणून त्याला अकादमीत पाठवण्यस सुरुवात झाली. तो आठ वर्षांचा असताना वडिलांनी त्याला ट्रेनिंगसाठी ओंटेरियोचे सुप्रसिद्ध कोच केसी कर्टिसकडे नेले. राओनिक खेळाबाबत गंभीर नाही, असे कर्टिस यांना वाटले. त्यांनी ट्रेनिंग देण्यास नकार दिला. मात्र, राओनिकने त्यांना आपली प्रतिभा दाखवली तेव्हा ते प्रशिक्षण देण्यास तयार झाले. कर्टिसने त्याला वयाच्या १६ व्या (२००७) वर्षापर्यंत प्रशिक्षण दिले. नंतर तो माँट्रियलला आला आणि पुढच्या वर्षी २००८ मध्ये तो प्रोफेशनल खेळाडू बनला. २०१० मध्ये त्याने करिअरचे पहिले ग्रँडस्लॅम यूएस ओपनच्या रूपाने खेळले. यात तो पहिल्याच फेरीत बाहेर झाला. २०१४ मध्ये तो पहिल्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅमच्या सेमीपर्यंत पोहोचला. सेमीत फेडररचे आव्हान तो मोडू शकला नाही.  २०१४ मध्ये तो कॅनडाची मॉडेल डॅनिएले कुंडसोनसोबत प्रेमात पडला. दोघे सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. राओनिक चॅरिटी कामातही रस घेतो. त्याने २०१२ मध्ये मिलोस राओनिक फाउंडेशनची सुरुवात केली होती. या फाउंडेशनद्वारे तो गरजू मुलांची मदत करतो.  
 
विक्रम आणि कमाई
-   पुरुष एकेरीच्या टाॅप-३ मध्ये प्रवेश करणारा कॅनडाचा पहिला खेळाडू.  
-    ताशी २५० किमी पेक्षा अधिक वेगाने सर्व्हिस करू शकणाऱ्या जगातल्या सहा खेळाडूंपैकी एक.  
-    एकेरीत आतापर्यंत २५९ सामने जिंकले असून, १२० मध्ये पराभव झाला आहे.  
-   ९८ कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस रक्कम जिंकली आहे.
बातम्या आणखी आहेत...